आजकालच्या धावपळीत अनेकदा आपण चेहऱ्याची काळजी घ्यायला विसरतो. तसेच तणाव किंवा झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली काळे वर्तुळ होतात. यामुळे चेहरा निस्तेज दिसायला लागतो. मात्र डोळ्यांवरील हे काळे वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता.
बडाम तेल
बदाम तेल यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे डोळ्यांखालील सूजदेखील कमी होते. यामध्ये सूज कमी करणारे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत आणि त्यामुळे काळी वर्तुळे कमी होतात. यासाठी डोळ्यांखाली बदाम तेल लावून हलक्या हाताने मालिश करा.
कोरफड
कोरफड त्वचेसाठी गुणकारी असते हे आपण सर्वच जाणतो. डोळ्यांखालचे काळे वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही कोरफड वापरू शकता. झोपण्यापूर्वी दररोज चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावल्याने फायदा होतो.
काकडी
काकडी ही थंड असते. त्यामुळे डोळ्यांखालीची काळी वर्तुळे कमी होतात. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि सौम्य तुरट गुणधर्म असतात. त्यासाठी काकडीचे तुकडे तुमच्या बंद डोळ्यांवर 10-15 मिनिटे ठेवा.
बटाटा
बटाट्यामुळे डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्चमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर असतात. एक बटाटा घेऊन त्याचे गोल तुकडे करा. आता हे तुकडे 5-10 मिनिटांसाठी डोळ्यांवर लावा.
व्हिटॅमिन-ई
व्हिटॅमिन-ई असलेले तेल आणि कॅप्सूल ओलावा देतात. हे घरी सहज उपलब्ध होत नसले तरी कोणत्याही मेडिकलमधून तुम्ही हे घेऊ शकता. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्याचे अँटीएजिंग गुणधर्म सुरकुत्या कमी करण्यासदेखील मदत करतात.