NEET 2025 : 'आयआयबी' विद्यार्थ्यांची 'नीट' परीक्षेत बाजी
esakal June 22, 2025 03:45 PM

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट-२०२५’ परीक्षेत आयआयबी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या संस्थेतील १४ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत.

यात श्रेयस डमके, स्वरूप बोदडे, अपूर्वा केंद्रे, कार्तिक भेंडेकर, प्रियांशू मनोहर, हर्षद खाकरे, शिवम मुटकुळे, आयुष गांधी, मकरंद वाघमारे, रोहन खर्चे, हुजेफ शेख, क्षिती कोकणे, यश उंबरेकर, मयांक चव्हाण यांचा समावेश आहे. ‘आयआयबी’च्या शुभ्रा कदम, विश्ववरद कांबळे आणि निहाल जाधव यांना भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेश मिळाले आहेत.

तसेच सीईटी पीसीएम ग्रुपमध्ये ९९ हून अधिक पर्सेंटाईल मिळविलेले ‘आयआयबी’चे सात विद्यार्थी असून यात स्वरूप चव्हाण (९९.४२), समीरा सरपोतदार (९९.४२), समीक्षा कासले (९९.३९), प्रज्वल पाटील (९९.३१), प्रीती कदम (९९.२९), सिद्धी कुंभार (९९.१०), स्वप्नील चव्हाण (९९.०७) यांचा सामावेश आहे. ‘आयआयबी’मध्ये उत्कृष्ट कोचिंगसोबतच टेस्ट सिरीजही चांगल्या आणि दर्जेदार पद्धतीने घेतल्या जातात.

यामुळे ‘नीट’ मध्ये यश मिळविणे अधिक सोपे झाले असल्याचे विद्यार्थी आणि पालकांनी सांगितले. याप्रसंगी ‘आयआयबी’चे दशरथ पाटील म्हणाले, ‘‘यापुढेही असाच उच्चांक कायम राखत विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास कायम राखण्यास आम्ही प्रयत्न करू. विद्यार्थी व पालकांचा विश्वास हा आमच्या मेहनतीची प्रेरणा आहे.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.