जालना : एक लाखाचे एक कोटी रुपये करतो म्हणून गंडा घालणाऱ्या भोंदू बाबा रतन आसाराम लांडगे (वय ४५, रा. भक्तेश्वरनगर, जालना) याच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात अजून एक गुन्हा दाखल झाला. चिखली (जि. बुलडाणा) येथील एका व्यक्तीला तब्बल ४६ लाखांना गंडा घातला होता. दरम्यान, संशयित लांडगे पोलिस कोठडीत आहे.
पेरेजपूर (ता. साक्री, जि. धुळे) येथील किशोर शेवाळे यांना एक लाखाचे एक कोटी रुपये करतो म्हणून साडेपाच लाखांना गंडा घालणाऱ्या भोंदू बाबा रतन लांडगे याला जालना तालुका पोलिसांनी अटक केली होती.
संशयिताला सोमवारपर्यंत (ता.२३) पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशात चिखली येथील रामेश्वर केशवराव उबाळे (रा. जिजामातानगर, चिखली, जि. बुलडाणा) यांना ४६ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी लांडगे विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ऑक्टोबर २०२३ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान लांडगे याने ४६ लाख रुपये उकळले.
मात्र, पैशांचा पाऊस न पडल्याने रामेश्वर उबाळे यांनी पैसे परत मागितल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धकमी देत पुन्हा दहा लाखांची मागणी केल्याचे उबाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भोंदू लांडगेसह अन्य एकाने पैसे घेतल्याची फिर्यादीत म्हटले आहे. सोमवारी सदर बाजार पोलिस रतन लांडगेच्या पोलिस कोठडीची आणखी मागणी करणार आहेत.
Jalgaon To Pandharpur : ‘जळगाव सायकलिस्ट’ पंढरपुरात पार पाडणार गोल रिंगण म्हणून झाला गुन्हा दाखललांडगे याला या भोंदूगिरीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती फिर्यादी उबाळे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी हिंमत करून गुन्हा दाखल केला. पैसे मागितले तर कुटुंबाला ठार मारण्याची धमकी लांडगे याने दिल्याने दिलेल्या पैशावर पाणी सोडल्याचे उबाळे यांनी सांगितले.
मित्राच्या नादाला लागून गेले पैसेरामेश्वर उबाळे यांच्या एका मित्राने रतन लांडगे पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगितले. तो मित्र उबाळे यांना सोबत घेऊन लांडगे याच्याकडे आला. त्यावेळी उबाळे यांच्यासमोर पैशांचा पाऊस पाडल्यामुळे उबाळे यांनीही सुरवातीला १० लाख रुपये दिले. परंतु, पूजेमध्ये विघ्न आल्याचे भासवून सतत रतन लांडगे उबाळे यांच्याकडून पैशांची मागणी करत राहिला आणि उबाळे देत राहिले.