Jalgaon To Pandharpur : 'जळगाव सायकलिस्ट' पंढरपुरात पार पाडणार गोल रिंगण
esakal June 22, 2025 03:45 PM

भूम, (जि. धाराशिव) : जळगाव येथून पंढरपूरकडे निघालेली सायकल वारी भूम शहरात २१ जून रोजी सकाळी दाखल झाली. तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी ‘जळगाव सायकलिस्ट’चे अध्यक्ष नीलेश चौधरी, नीलेश भावसार, आरती व्यास, भूपेंद्र व्यास, अजय कानडे यांच्यासह सायकलिस्ट उपस्थित होते.

जळगावपासून पंढरपूर येथे ६० सायकलिस्ट सायकल स्वारी करून पंढरपूरमध्ये पोचणार आहेत. ता. १९ जून रोजी जळगाव येथून त्यांचा प्रवास सुरू झाला. हे सायकलिस्ट ४८५ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

जळगाव ते संभाजीनगर (२० जून) १६५ किमी पहिला मुक्काम, त्यानंतर संभाजीनगर ते मांजरसुंबा १५५ (२१ जून) किमी दुसरा मुक्काम. त्यानंतर मांजरसुभा ते पंढरपूर १६५ पंढरपूर असा ४८५ किमीचा प्रवास ते करणार आहेत.

Cluster Bombs : ‘क्लस्टर बाँब’ची पुन्हा दहशत; इराणकडून वापरामुळे जग चिंतेत

जळगाव सायकलिस्ट यांच्याकडून पंढरपूरमध्ये गोल रिंगणाचे व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘जळगाव सायकलिस्ट’चे अध्यक्ष नीलेश चौधरी यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.