तेहरान : इस्राईलविरोधातील संघर्षात इराणने प्रथमच क्लस्टर बाँबचा वापर केला आहे. अल्पावधीत मोठी जीवितहानी घडवून आणण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जातो. इस्राईलच्या लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे.
भविष्यात इराणकडून आणखी अशाच प्रकारच्या संहारक शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त होते आहे. इस्राईलच्या मध्यवर्ती भागाला लक्ष्य करून या बाँबद्वारे हल्ला करण्यात आला होता.
हा बाँब कसा फुटतो?क्लस्टर बाँबचा हवेत स्फोट झाल्यानंतर त्यातून आणखी शेकडो स्फोटके बाहेर पडतात आणि ती मोठ्या भूप्रदेशात विध्वंस घडवून आणतात. एकाच वेळी फुटणाऱ्या बाँबपेक्षा हे शस्त्र अधिक घातक मानले जाते. विशेष म्हणजे ही स्फोटके स्वयंचलित नसतात. जमिनीवर पडल्यानंतर त्यांचा अल्पावधीत स्फोट होतो.
यानंतरही काही स्फोटके तशीच न फुटलेल्या अवस्थेत पडून राहतात त्यामुळे त्यांचा नंतर स्फोट होऊन त्यात नागरिक जखमी होण्याचा धोका असतो. लोकसंख्येची अधिक घनता असलेला भूप्रदेश, घरे आणि पायाभूत सुविधांचा या बाँबमुळे विध्वंस होतो.
रशिया- युक्रेन युद्धात वापररशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने हा बाँब झेलेन्स्की यांना दिला होता, त्यावरूनही बराच वादंग झाला होता. युक्रेननेही रशियाकडून क्लस्टर बाँबचा वापर झाल्याचा आरोप केला होता.
Jalna News : विद्यार्थ्यांसमोरच झोपणाऱ्या शिक्षकाची होणार चौकशी; शिक्षण विभागाचा आदेश : गाडेगव्हाण येथील प्रकार२००९ मध्ये
क्लस्टर
बाँबवर बंदी
१११ देशांच्या
दस्तावेजावर
स्वाक्षऱ्या
११
संस्थांकडून
स्वाक्षऱ्या
हे देश कराराच्या विरोधात : इराण, इस्राईल अमेरिका आणि रशिया
क्लस्टर बाँबमुळे मोठ्या भूप्रदेशात विध्वंस होतो. नागरी भागामध्ये तो फुटला तर असंख्य स्फोटके लगतच्या परिसरामध्ये विखुरली जातात त्यामुळे देखील आणखी जीवितहानी होऊ शकते.
- डॅरिल किमबॉल, कार्यकारी संचालक,
शस्त्र नियंत्रण संघटना