बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Aamir Khan ) बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कलेक्शन केले आहे. आमिर आणि जिनिलियाचा (Genelia ) 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन दिवसांत चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.
View this post on InstagramA post shared by Genelia Deshmukh (@geneliad)
आमिर खान आणि जिनिलिया देशमुखच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी उंच भरारी घेतली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर' चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदीत 10.6 कोटी रुपये, तमिळमध्ये 0.5 कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये देखील 0.5 कोटी रुपये कमावले आहे.
'सितारे जमीन पर' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. रिलीजच्या पहिल्या वीकेंडला शनिवारी 'सितारे जमीन पर' चित्रपटाने 21.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपटाने एकूण 32.20 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता रविवारीचित्रपट किती कोटीचे कलेक्शन करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
View this post on InstagramA post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)
दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये
दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये
एकूण - 32.20 कोटी रुपये
'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूडची अभिनेत्री जिनिलिया देशमुख देखील झळकली आहे. या चित्रपटात नवीन कलाकार देखील पाहायला मिळले आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे.
'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले.
मृणाल ठाकूर नाही, तर Son of Sardaar 2 मध्ये अजय देवगण 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स