मृणाल ठाकूर नाही, तर Son of Sardaar 2 मध्ये अजय देवगण 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स
Saam TV June 22, 2025 04:45 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण अलिकडे त्याच्या 'रेड 2' (Raid 2) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत होता. 'रेड 2'ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता अजय देवगण एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'सन ऑफ सरदार 2'(Son Of Sardar 2) साठी खूपच उत्सुक आहेत. आता या चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार2' चित्रपटात भरपूर ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. 'सन ऑफ सरदार 2' हा 2012 साली रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर देखील झळकणार आहे. चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, 'सन ऑफ सरदार 2'मध्ये बॉलिवूडच्या अजून एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगणच्या पत्नीची भूमिकेत अभिनेत्री नीरू बाजवा पाहायला मिळणार आहे.

'सन ऑफ सरदार 2'

'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजयदेवगण, मृणाल ठाकूर , नीरू बाजवा यांच्यासोबत अजून कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात विंदू दारा सिंह, रवी किशन आणि शरत सक्सेना यांचा समावेश आहे. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

'सन ऑफ सरदार 2' रिलीज डेट

अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार 2' हा फुल कॉमेडी चित्रपट 25 जुलै 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नीरू बाजवा वर्कफ्रंट

अभिनेत्री नीरू बाजवान आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत. ती पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चाहते आता नीरू बाजवाला अजय देवगणसोबत पाहायला उत्सुक आहेत.

Indrayani Video: इंदूला मिळणार का अधूची साथ? पाहा 'इंद्रायणी' मालिकेत पुढे काय घडणार
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.