Bonus Issue : भागधारकांना मिळणार तब्बल २९ शेअर्स बोनस, १ वर्षात शेअर्सने केले पैसे दुप्पट
ET Marathi June 22, 2025 04:45 PM
मुंबई : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात अनेक कंपन्यांकडून बोनसची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी काही कंपन्या येत्या काळात बोनस देतील. तर काही कंपन्यांनी आधीच बोनसची घोषणा केली आहे. आता आणखी एका कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपनी फोकस बिझनेस सोल्युशनने माहिती दिली की संचालक मंडळाने बोनस जारी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.



रेकॉर्ड तारीख

Focus Business Solutions ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की, शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये २९:५० च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली. म्हणजेच गुंतवणूकदारांना ५० शेअर्सवर २९ बोनस शेअर्स दिले जातील. हा शेअर बीएसईवर एमटी ग्रुप अंतर्गत येतो. एम म्हणजे एसएमई प्लॅटफॉर्म आणि टी ग्रुप म्हणजे ट्रेड टू ट्रेड सेगमेंट अंतर्गत येणारे शेअर्स. हा शेअर सध्या १३५ रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीने अद्याप या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही.





नवीन उच्चांक

शुक्रवारी Focus Business Solutions च्या शेअर्सवर बोनस शेअरच्या निर्णयाचा परिणाम दिसून आला. बाजार बंद होताना शेअर १३५ रुपयांवर व्यवहार करत होता. शेअर्स बीएसईवर ३ टक्क्यांहून अधिक वाढला. हा शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे. या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५९.५७ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ६२.२० कोटी रुपये आहे.



मोठा परतावा

शेअर बाजारातही फोकस बिझनेस सोल्युशन लिमिटेडने गुंतवणूकदारांना निराश केलेले नाही. फक्त ३ महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना ६६ टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स १ वर्षापासून धारण केले आहेत त्यांनी आतापर्यंत १०४ टक्के नफा कमावला आहे. या काळात सेन्सेक्स निर्देशांकात फक्त ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. फोकस बिझनेस सोल्युशन लिमिटेडच्या शेअर्सची किंमत ३ वर्षात ७५० टक्क्यांनी वाढली आहे.





दोनदा लाभांश

फोकस बिझनेस सोल्युशन लिमिटेडने २०२३ मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले होते. तेव्हा कंपनीने प्रत्येक ५ शेअर्समागे ४ शेअर्स बोनस म्हणून वाटले होते. त्याच वेळी या कंपनीने गुंतवणूकदारांना दोनदा लाभांश दिला आहे. पहिल्यांदाच २०२२ मध्ये ३८ पैसे आणि २०२४ मध्ये १० पैसे लाभांश देण्यात आला.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.