मेडिकल सर्टिफिकेट गेलेल्या महिलेस डॉक्टरकडून नको तिथं स्पर्श, विनयभंग, सोलापुरात धक्कादायक प्रक
Marathi June 22, 2025 08:24 PM

सोलापूर गुन्हा: राज्यभरातून महिला अत्याचाराच्या व एकूणच गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य केंद्रात गेलेल्या महिलेसोबतच या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)

ही घटना मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. एका महिलेला वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट हवे असल्याने ती संबंधित आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेली होती. तपासणी करत असताना आरोग्य केंद्रातील डॉक्टर अमित गायकवाड याने तपासणीच्या नावाखाली महिलेस अश्लीलरीत्या स्पर्श केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिला घाबरली, मात्र तिने धाडस दाखवत थेट पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दिली.

डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

महिलेच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिसांनी डॉक्टर अमित गायकवाड याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, तत्काळ कारवाई करत त्याला अटकही करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे शासकीय आरोग्य संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.सरकारी सेवेतील कर्मचारीच अशा प्रकारचे वर्तन करत असतील, तर महिलांनी विश्वासाने कुठे जावे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महिला वैमानिमाचा कॅबचालकासह आणखी दोघांकडून अतिप्रसंग

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी एका महिला वैमानिकासोबत चालत्या कॅबमध्ये अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाने रस्ता बदलून गाडीत दोन अज्ञात व्यक्तींना बसवलं आणि त्या दोघांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपी पळून गेले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Mumbai Crime)

हेही वाचा

एका तासाला 200 रुपये, अमरावतीच्या कॅफेमध्ये तरुण तरुणींचे अश्लील चाळे; दामिनी पथकाने रंगेहात धरले

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.