इराण- इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, भारतीय शेअर बाजाराकडे लक्ष,  ‘या’ स्टॉक्सवर लक्ष ठेवा
Marathi June 22, 2025 10:25 PM

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई:  इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धात आत अमेरिकेनं एंट्री केली आहे. अमेरिकेच्या एंट्रीमुळं युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजार उद्या म्हणजेच सोमवारी सुरु हणार आहे. या वेळी काही स्टॉक्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. त्या स्टॉक्समध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धात अमेरिकेनं एंट्री करत इराणच्या आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. यामुळं कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळं क्रूड ऑईलचे दर वाढू शकतात. याचा परिणाम तेल पुरवठा कंपन्यांच्या स्टॉक्सवर होऊ शकतो. संरक्षण क्षेत्रातील स्टॉक्सवर देखील परिणाम होऊ शकतो. 

हिंदुस्तान एअरोनॉटिक्सनं ISRO कडून SSVL तंत्रज्ञान मिळवंल आहे. कंपनीनं यासाठी 511 कोटी रुपयांची बोली लावली होती. पुढच्या दोन वर्षात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स भारतातील SSLV रॉकेट बनवणारी एकमेव कंपनी ठरु शकते. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) कंपनीला 5 जून नंतर 585 कोटींच्या कामाची ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये मिसाईल फायर कंट्रोल सिस्टीम, कम्युनिकेशन यंत्रं, जॅमर, स्पेअरचा समावेश आहे. 

वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीज या कंपनीनं सोलर ईपीसी डील 246.92 कोटी रुपयांपर्यंत वाढवली होती.  या प्रकल्पाची एकूण किंमत 1480.40 कोटी रुपये झाली आहे. ही ऑर्डर 2012.47  मेगावॅट ग्राऊंड माऊंटेड सोलर प्रकल्पाशी संबंधित आहे. 

बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाची बैठक 26 जूनला होणार आहे यामध्ये लाँग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर बाँडस द्वारे फंड  तयार करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँकेनं 7.50 टक्के कूपन दरानं 10 वर्षांच्या बाँडद्वारे 2690 कोटी रुपये जमवले. बँक आता 5000 कोटी रुपयांचे बेसल-III कॉम्पलायंट बाँड जारी करण्याचं नियोजन करत आहे. 

मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी Granules India  या कंपनीनं तेलंगानातील बोनथापल्ली येथील API यूनिट -I  नं अमेरिकेच्या एफडीएचं परीक्षण पूर्ण केलं आहे.  या कंपनीचा स्टॉक देखील चर्चेत असेल.

सोमवारी भारतीय आयटी शेअरवर देखील गुंतवणूकदारांचं लक्ष असेल. जागतिक आयटी कंपनी Accenture चे शुक्रवारी निकाल आले आहेत. कंपनीनं वार्षिक उत्पन्न वाढीचा अंदाज 6-7 टक्के ठेवला आहे. या शिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्मॉल फायनान्स बँकांच्या कर्ज वाटपाच्या मर्यादेत सूट दिली आहे. शुक्रवारी  जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार प्राथमिक क्षेत्रासाठी अनिवार्य असलेल्या क्षेत्राला कर्जवाटप करण्याची मर्यादा 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळं कृषी आणि लघू उद्योग क्षेत्राला कर्ज देणं सोपं होईल.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.