मेंदूत ‘एन्युरिझम’ आहे, तरीही सलमान करतोय काम!
Marathi June 23, 2025 01:25 PM

अभिनेता सलमान खानने कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती दिली. त्याने लग्न, आरोग्य आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत खुलासे केले. कपिल शर्माने लग्नाबाबत विचारले असता सलमान म्हणाला की, लग्न आणि घटस्फोट हे भावनिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून खूप कठीण असतात. आयुष्याच्या या टप्प्यावर नव्याने सुरुवात करणे सोपे नसते. मी रोज हाडांना मालीश करून घेत असतो. फासळ्या तुटल्या आहेत. ट्रायजेमिनल न्युराल्जिया’असूनही काम करतोय. मेंदुमध्ये ‘एन्युरिझम’ आहे, तरीही काम करतोय. ‘एव्ही मालफॉर्मेशन’ आहे, तरीही मी पुढे चाललोय, असे सलमान खान म्हणाला. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा मेंदूचा आजार आहे. हा एक न्युरोलॉजिकल आजार आहे, ज्यामध्ये चेहऱ्याच्या नसांमध्ये तीव्र वेदना होतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.