इस्त्रायल इराण युद्धाचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स तब्बल 704 अंकांनी घसरला. तर, निफ्टी 420 अंकांनी घसरला
वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यूखासगी ट्यूशनच्या टेस्टमध्ये कमी गुण मिळाले म्हणून बापानेच रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना अटक केली आहे. धोडींराम हे एका माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत.
इंधणाचे दर वाढण्याची शक्यता, इस्त्रायल-इराण युद्धाचा जगाला फटकाइस्त्रायल-इराण युद्धाचा फटका जगाला बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या संसदेने तेलपुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या निर्णयाने जगातील निम्म्या देशांना होणाऱ्या तेलपुरवठ्यावर थेट परिणाम होणार आहे.
नागपूरकरांची तक्रार ऐकली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, केली अधिकाऱ्यांची कानउघडणीमागील काही काळापासून नागपूर शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.काल (रविवारी) हैदराबाद हाऊस येथील बैठकीत नागपूरतील लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांची केली कान उघडणी केली.नागपूरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी ऐकून मुख्यमंत्री संतप्त झाले होते.