इंग्लंड क्रिकेट संघाने मंगळवारी (२४ जून) भारतीय संघाविरुद्ध तेंडुलकर - अँडरसन ट्रॉफी या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने भारताला ५ विकेट्सने पराभूत केले.
यामुळे शुभमन गिलची कसोटी कर्णधार म्हणून मात्र पराभवाने सुरुवात झाली. हा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत रोमांचक झाला होता, पण अखेर इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
WTC 2025-27 च्या पहिल्याच सामन्यात दोन शतकं; SL vs BAN कसोटीत धावांचा पाऊस, दिग्गज खेळाडूचा निवृत्तीचा सामनालक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचाही भाग आहे. १७ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे या स्पर्धेत इंग्लंड पहिला विजय मिळवणारा संघ ठरला. त्यामुळे त्यांना विजय मिळवल्याने १२ गुण मिळाले आहेत आणि त्यांची टक्केवारीही १०० आहे. त्यामुळे ते आता पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत.
आत्तापर्यंत इंग्लड आणि भारत यांच्याशिवाय या स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातही एक कसोटी सामना झाला आहे. सध्या या दोन संघातही श्रीलंकेत कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी ४ गुण मिळाले, तर त्यांची टक्केवारी प्रत्येकी ३३.३३ अशी आहे.
भारताचा संघ पहिल्या पराभवामुळे शून्य गुण शून्य टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे. अन्य ५ संघ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे अद्याप या स्पर्धेत सामने सुरू झाले नसल्याने ते अनुक्रमे ५ ते ९ क्रमांकावर आहेत.
इंग्लंडने हेडिंग्लेमध्ये झालेल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य चौथ्या डावात ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग इंग्लंडने ८२ षटकात ५ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.
हेडिंग्लेमधील इंग्लंडचा कसोटीतील हा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. याआधी त्यांनी एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग या मैदानात केला नव्हता.
इंग्लंडकडून या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात बेन डकेटने १४९ धावांची खेळी केली. त्याने ६५ धावा करणाऱ्या झॅक क्रावलीसोबत सलामीला १८८ धावांची भागीदारी केली. जो रुटनेही नाबाद ५३ धावा केल्या, तर जॅमी स्मिखने नाबाद ४४ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Aiden Markram Video: 'अरे बिअर आहे! तो असं म्हणाला म्हणून गेलो...', मार्करमनं सांगितलं WTC जिंकल्यानंतर काय झालं?तत्पुर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल (१०१), शुभमन गिल (१४७) आणि रिषभ पंत (१३४) यांच्या शतकाच्या जोरावर ११३ षटकात सर्वबाद ४७१ धावा केल्या. या डावात इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात १००.४ षटकात सर्वबाद ४६५ धावा केल्या. त्यामुळे भारताला ६ धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडकडून ऑली पोपने १०६ धावा केल्या, तर हॅरी ब्रुकने ९९ धावांची खेळी केली आणि बेन डकेटने ६२ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या.
भारताने दुसऱ्या डावात ९६ षटकात सर्वबाद ३६४ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने १३७ धावा आणि रिषभ पंतने ११८ धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.