डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरण: आरोपी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज होणार निर्णय
Marathi June 25, 2025 12:32 PM

डॉ. शिरिश वलसंगकर: सोलापुरातील (Solapur) डॉ. शिरीष वळसंगकर (Dr Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्या प्रकारणातील आरोपी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज (25 जून ) निर्णय होणार आहे. न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे या गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी मनीषा मुसळे यांनी न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. या प्रकरणी 23 जून रोजी सुनावणी झाल्यानंतर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (Sओलापूर सत्र न्यायालय) निर्णय राखून ठेवला होता. अशातच आज या जामीन अर्जावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे आता मनीषा मुसळे यांना  जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर?

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar)  हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते.

मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.