संतापजनक! अडवीसिद्धेश्वर मठात महिलेसोबत रंगेहाथ सापडले स्वामी; मुलीचेही फाडले कपडे, संतप्त गावकऱ्यांकडून स्वामींना बेदम मारहाण
esakal June 25, 2025 03:45 PM

बेळगाव (कर्नाटक) : मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावात स्थित अडवीसिद्धेश्वर मठात घडलेल्या एका प्रकाराने गावात मोठी खळबळ उडालीये. मठाचे स्वामी अडवीसिद्धराम एका महिलेसह त्यांच्या खोलीत आढळून आले, ज्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मठातच गर्दी करत स्वामींना जाब विचारला. या वादळी घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वामी महिलेसह खोलीत, गावकऱ्यांचा संताप

बागलकोट जिल्ह्यातील तालिकोट येथून आलेली महिला आपल्या मुलीसह मठात थांबली होती. 21 जून रोजी रात्री सुमारे दहा वाजता काही स्थानिकांनी मठाच्या खोलीत स्वामी, महिला आणि तिच्या मुलीला एकत्र पाहिले. यानंतर गावकऱ्यांनी तातडीने मठाबाहेर एकत्र येत संतप्त प्रतिक्रिया दिली.

'दलित तरुणांना गुडघ्यावर चालायला, गवत खायला अन् घाण पाणी प्यायला लावलं'; राहुल गांधी म्हणाले, 'हा मनुवादी विचारसरणीचा...' स्वामींना मारहाण, महिलेसह गैरवर्तनाचा आरोप

गावकऱ्यांनी स्वामी अडवीसिद्धराम यांना धक्काबुक्की केली असून त्यांच्या कपाळावर दुखापत झाली आहे. त्याच वेळी जमावातील काही तरुणांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. मुलीचे कपडे फाडण्यात आले आणि तिला ओढत नेण्यात आले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

'त्यानं त्याच्या पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला अन् 24 लाख आणि 25 तोळे सोनेही उकळले'; पीडित महिलेचा गंभीर आरोप पोलीस हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत महिलेला आणि तिच्या मुलीला सुरक्षित ठिकाणी हलवले आणि समुपदेशन केंद्रात पाठवले. गावकऱ्यांच्या मागणीनुसार, स्वामींना रात्रीतून मठातून बाहेर काढण्यात आले असून सध्या ते गोकाक (बेळगाव) येथे असल्याचे समजते.

संतापजनक! अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन स्वामीने केला अत्याचार; मठात धार्मिक वस्तूंपेक्षा सापडल्या वेगवेगळ्या तलवारी, जांबिया, कोयते पूर्वीही घडली होती अशाच स्वरूपाची घटना

या घटनेमुळे काही आठवड्यांपूर्वी रायबाग तालुक्यातील मेकळी गावात घडलेली घटना आठवते. तेथे राम मंदिर उभारणाऱ्या हठयोगी लोकेश्वर स्वामींवर अल्पवयीन मुलीच्या अपहरण व बलात्काराचा आरोप झाला होता. त्यामुळे धार्मिक संस्थांवरील विश्वासावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.