तलाठी अन् १७ वर्षीय तरुणीनं एकत्र का संपवलं जीवन? दोघांच्या वेगवेगळ्या चिठ्ठ्या; कोकणकड्याजवळ नेमकं काय घडलं?
esakal June 25, 2025 08:45 PM

जुन्नर : घरातून बेपत्ता असलेल्या रामचंद्र पारधी (वय ४०) व एका १७ वर्षाच्या तरुणीने दुर्गवाडी (ता. जुन्नर) येथील कोकण कड्यावरून (Kokankada) उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांच्या एकत्रित आत्महत्येचे कारण तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक किरण अवचर (Police Inspector Kiran Avchar) यांनी सांगितले.

दुर्गवाडीचे पोलिस पाटील दीपक पारधी यांनी ह्या घटनेची फिर्याद दिली आहे. यात कोकणकड्याजवळ उभी असलेली कार व तेथून जवळच महिला व पुरुषाची चप्पल जोड दिसून आल्याने कड्याच्या खाली पाहिले असता, त्यांना मृतदेह दिसून आला असल्याचे नमूद केले आहे.

पोलीस प्रियकराच्या प्रमोशनसाठी पत्नीनं पतीकडून उकळले 5 लाख, OYO तला व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल; पतीनं स्वत:ला संपवलं

याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी रविवारी (ता. २२) शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दाट धुके आणि पाऊस तसेच अंधार पडल्याने शोध घेता आला नाही. पोलिसांनी सोमवारी (ता. २३) मृतदेहाचा शोध घेतला, तेव्हा प्रथम रूपाली तर तेथून जवळच रामचंद्राचा मृतदेह मिळून आला.

येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम, पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने कोकणकड्याच्या खोल दरीतून दोघांचे मृतदेह वर काढले. त्यांच्या नातेवाइकांनी ते ओळखले. मृत पारधी यांची कोकणकड्यावर असलेली कार जुन्नर पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे. पोलिस पाटील दीपक पारधी यांच्या फिर्यादीनुसार, जुन्नर पोलिसांनी आकस्मिक मयत म्हणून नोंद केली आहे.

Pimpri-Chinchwad Crime : पतीच्या निधनानंतर दुसरं लग्न, त्यानंतर विवाहबाह्य संबंध; दुसऱ्या पतीनं पत्नीसह प्रियकराला संपवलं

आत्महत्येपूर्वी रामचंद्र व तरुणी यांनी स्वतंत्रपणे लिहून ठेवलेल्या चिठ्ठ्या पोलिसांना मिळाल्या असून त्यात उल्लेख केलेल्या संबंधित नातेवाइकांकडे चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती आत्महत्येमागील नेमकी कारणे स्पष्ट होतील, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे यांनी सांगितले.

राजाच्या हत्याकांडात धक्कादायक ट्विस्ट; सोनम म्हणाली, 'राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते म्हणून पतीला आयुष्यातून..'

मृत रुपाली व रामचंद्र एकमेकांचे नातेवाईक होते. रामचंद्र श्रीगोंदा येथे तलाठी म्हणून कार्यरत होता, तो पत्नीसह अहिल्यानगर येथे राहत होता. त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात केली होती. मृत तरुणी महाविद्यालयात शिकत होती. ती (ता. १४) पासून बेपत्ता असल्याची तक्रार जुन्नर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

रामचंद्र पारधी यांनी चिठ्ठीत आई-वडील व भावाची माफी मागितली असून पत्नी आणि तिच्या नातेवाइकांनी मानसिक त्रास दिला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा, असे म्हटले आहे. तर, तरुणीने आई-वडील तसेच इतर काही जणांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.