Stray Dogs Attack Deer in Sinnar : सिन्नरमध्ये मोकाट कुत्र्यांचा हरणावर हल्ला; जीव वाचवला पण वनविभागाच्या दिरंगाईने संताप!
esakal June 26, 2025 01:45 AM

सिन्नर- वावी शिवारात शिर्डी मार्गालगत हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. त्यास चावे घेतल्याने अत्यवस्थ स्थितीतून हरणाला सोडवून उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सिन्नर तालुक्यातही वाढला आहे.

शिंदे वस्तीवर ही घटना घडली. हरिण नाल्यात पाणी पिण्यासाठी आले होते. चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवून जखमी केले. वन्य प्राणी मित्र दुर्गेश शिंदे यांनी कुत्र्यांना हुसकावून लावत त्याची सुटका केली. एका चारचाकी वाहनातून त्यास घरी आणले. खासगी पशुवैद्यक डॉ. सचिन संधान यांना बोलावून त्याच्यावर उपचार केले. हरणाची स्थिती नाजूक होती. तथापि, संधान यांनी दोन तास उपचार करून दुर्गेश शिंदे यांनी वनविभागाला कळविले. तथापि, चोवीस तास उलटूनही वनविभागाचे कोणीही हरणाकडे फिरकले नसल्याने प्राणी मित्रांनी नाराजी व्यक्त केली.

Sahyadri Tiger: 'सह्याद्री व्याघ्रमध्ये आढळला दुर्मिळ रानकुत्रा'; १९३६ नंतर प्रथमच नोंद , कऱ्हाड पर्यटकाच्या दृष्टीस

पाणवठ्यांचा अभाव

शिर्डीमहामार्गावर अनेकदा हरणांना अपघात घडतात. त्यामुळे परिसारत पाणवठे निर्माण करण्याची मागणी असूनही अद्यापही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे. नांदूरशिंगोटे वनपरिमंडळ कार्यालयात उपचार नांदूरशिंगोटे वनपरिमंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्याने दुसऱ्या दिवशी त्यास ताब्यात घेतले. तेथे उपचार सुरु करण्यात आले आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.