Ashadhi Wari: 'सातारा जिल्ह्यात आज माऊलींच्या सोहळ्याचे आगमन', लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार जंगी स्वागत
esakal June 26, 2025 02:45 PM

लोणंद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उद्या (गुरुवार) दुपारी दीड वाजता जिल्ह्यातील पाडेगाव (ता. खंडाळा) येथे आगमन होत आहे. त्यावेळी पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Satara News: 'धुळोबा डोंगरात बिबट्या अन् बछडा'; घारेवाडीत कोयनाकाठ ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांपुढेच वावर

दुपारच्या विसाव्यानंतर नीरा नदीतील दत्त घाटावर माउलींच्या पादुका स्नानाचा सोहळा रंगणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे आगमन होईल.

त्यावेळी जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार सचिन पाटील, महेश शिंदे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक- निंबाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे- पाटील, माजी सभापती आनंदराव शेळके-पाटील, मनोज पवार, माजी सदस्या दीपाली साळुंखे, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील आदींकडून स्वागत होईल.

दरम्यान, सोहळ्याच्या स्वागताची बाळुपाटलाचीवाडी ग्रामपंचायत व लोणंद नगरपंचायतीच्या वतीनेही जय्यत तयारी केली आहे. माउलींच्या पादुकांना दत्त घाटावर नीरा स्नानासाठी नेण्यासाठी जुन्या पुलापासून दत्त घाटापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता नव्याने करून लोखंडी बॅरिकेड्स लावून व्यवस्था केली आहे. नीरा पाडेगाव (ता. खंडाळा) येथे टोल नाक्यावर स्वागतासाठी येणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांची जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीने मंडप टाकून बैठक व्यवस्था केली आहे. स्वागताच्या वेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

नीरा नदीत मोठा विसर्ग...

मंगळवारी रात्रीपासून वीर धरणातून नीरा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दत्त घाट व माउलींचे स्नानाचे ठिकाण पाण्याखाली गेले आहे. दत्त मंदिरात तसेच मंदिराकडे जाणारा बॅरिकेड्स लावून तयार केलेला रस्ताही पाण्याखाली गेला आहे. बुधवारी रात्री पाणी कमी होईल व परंपरेनुसार माउलींच्या स्नानाचा सोहळा गुरुवारी उत्साहात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळ लोणंदमध्ये गजबज
  • लोणंद रेल्वे उड्डाणपुलानजीक ग्रामविकास खात्याकडून यावेळी प्रथमच वारकऱ्यांसाठी जर्मन हॅंगर निवारा शेडची व्यवस्था

  • सकाळपासून लोणंदकडे येणाऱ्या वारकरी दिंड्या व वारकऱ्यांमुळे लोणंदनगरीत गजबज

  • बंदोबस्तासाठी पोलिस मोठ्या संख्येने शहरात दाखल झाल्याने पोलिसी छावणीची स्थिती

  • मिठाईवाले व स्टॉलधारकांची रेलचेल झाल्याने शहराला यात्रेचे स्वरूप

  • पाडेगाव येथे जिल्ह्याच्या सीमेवर तसेच पालखी मार्गावर, लोणंद शहरातही ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी पालखी सोहळ्याच्या स्वागताचे बॅनर लावल्याने वातावरण निर्मिती

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.