Raj Thackeray MNS on Dada Bhuse and Hindi as third language
Marathi June 26, 2025 06:24 PM


मुंबई : महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदी सक्तीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. अशामध्ये याला कडाडून विरोध करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (26 जून) पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली. तसेच, त्यावेळी त्यांनी तिसऱ्या भाषेमागचा तर्क काय? असे विचारात राज ठाकरेंनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शिक्षणावरही बोट ठेवले. काही लोकांनी, ‘हिंदी भाषेला विरोध करत तुम्ही विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी कमी करत आहात,’ अस मत मांडले. यावर राज ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, “असा हिंदीमध्ये काय आहे ठेला टाकायचा आहे का? की लगेच पहिली ते पाचवी हिंदी शिकवले की हिंदी सिनेमामध्ये काम मिळणार आहे?” असे म्हणत टीका केली. (Raj Thackeray MNS on Dada Bhuse and Hindi as third language)

हेही वाचा : Raj Thackeray : हिंदीसक्ती विरोधात 6 जुलैला मोर्चा काढणार, सर्वपक्षीय नेत्यांना राज ठाकरेंचे आवाहन 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “आधीच्या शिक्षणामध्ये पाचवीनंतर हिंदी आणि संस्कृत अशा पर्यायी भाषा होत्याच ना? यातूनच अनेकजण डॉक्टर, इंजिनीअर झाले. याच शिक्षण पद्धतीतून तयार झाले ना? महाराष्ट्र हा मोठा याच शिक्षण पद्धतीने आहे. मग आता काय असा साक्षात्कार झाला आहे बाकीच्यांना की महाराष्ट्रावर हिंदी लादली जात आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “पाचवीमध्ये हिंदी आणि संस्कृत असे पर्याय असतानाही दादा भुसे शिक्षणमंत्री झालेच आहेत की. तेव्हा क्रेडीट रेटिंगमध्ये विचारले होते का? दादा भूसेंना स्विमिंग येते का म्हणून?” असे म्हणत त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे शिक्षणच काढले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “भाषा सोडून तुम्ही कोणतीही गोष्ट घेऊन या, आम्ही त्याला पाठींबा देऊ. त्या वयामध्ये जर मुले स्विमिंग शिकली, सायकलिंगही येते, त्याच्यामध्ये इतरही गोष्ट येतात. भाषेचच बंधन का आणत आहात? यामागे तुमचा तर्क काय?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “समजा पहिलीच्या मुलांना तुम्ही सामूहिकरीत्या स्विमिंग शिकवले तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या जीआरमध्ये इतर गोष्टी नाहीत, फक्त भाषा आहे.” असे म्हणत त्यांनी टीका केली. “शिक्षणमंत्री सांगतात की 10 हजार शिक्षक आम्ही भरती करणार आहोत, पण त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न असताना आपण फक्त भाषेवरच का येतो? असा सवालही त्यांनी यावेळी केला.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.