16 आणि 17 वर्षांचा मुलांनाही करता येणार मतदान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी मोठा बदल
GH News July 18, 2025 12:09 AM

आपल्या देशात मतदाराचं किमान वय हे 18 वर्षे आहे. तसेच ब्रिटेनमध्येही मतदार 18 वर्षांचा झाला की मतदानाचा हक्क बजावू शकतो. पण कीर स्टार्मरच्या नेतृत्वाखालील ब्रिटेन सरकारने मोठं पाऊल उचलत मतदाराचं किमान वय 18 वरून 16 वर्षे केलं आहे. आता ब्रिटेनमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 16 आणि 17 वर्षांचे युवकही मतदान करू शकतात. ब्रिटेनमध्ये 1969 पर्यंत मतदाराचं किमान वय हे 21 वर्षे होते. त्यानंतर 21 वर्षावरून 18 वयपर्यंत कमी करण्यात आलं. आता ते 16 करण्यात आलं आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं की, हा बदल विधेयक संसदेत मंजूर केल्यानंतर लागू करण्यात येईल. सरकारच्या मते, या निर्णयामुळे 16-17 वर्षांच्या युवकांना आपलं मत देता येईल. यामागे कारणही देण्यात आलं आहे. या वयाची मुलं सैन्य दलात सेवा देतात. तसेच कर देखील भरतात त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क असावा असा तर्क सरकारने दिला आहे.

सध्या जगातील अनेक देशात मतदाराचं किमान वय 18 वर्षे आहे. भारतातही मतदाराचं किमान वय हे 18 निश्चित करण्यात आलं आहे. उपपंतप्रधान अँजेला रेयनर यांनी सांगितलं की, ‘गेल्या काही वर्षात आमच्या लोकशाहीवर जनतेचा विश्वास कमी झाला आहे आणि स्थानिक संस्थाकडे असलेल्या अपेक्षाही कमी झाल्या आहेत. त्यामुळे या पावलामुळे लोकशाहीत योग्य निवड करण्यासाठी अधिक लोकांना संधी मिळेल. आम्ही 16 वर्षांच्या मुलांना मतदानाचा हक्क देण्याबाबत घोषणापत्रात सांगितलं होतं. आता ते पूर्ण करत आहोत.’ दुसरीकडे, ओळखपत्र म्हणून बँक कार्ड, वाहन परवाना आणि व्हेटरन कार्ड यांचा डिजिटल ओळखपत्र म्हणून मतदार ओळखपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.

कोणत्या देशात सर्वात कमी वयात मतदान करण्याचा अधिकार आहे?

ब्रिटेनच्या या पावलानंतर आता काही निवडक देशांच्या यादीत त्यांचा समावेश होणार आहे. ब्राझील, अर्जेंटीना, इक्वाडोर, क्यूबा, ऑस्ट्रिया, निकारगुआ, माल्टा आणि आइल ऑफ मॅन या देशात 16 व्या वर्षी मतदान करता येते. तर इंडोनेशिया, उत्तर कोरिया, ग्रीस आणि तिमोर लेस्ते या देशात मतदाराचं किमान वय हे 17 वर्षे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.