बीडच्या उमाकिरण परिसरातील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसात दाखल झाल्यानंतर बीड मधील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे. तात्काळ आरोपींना अटक न झाल्यास सोमवारी बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
Dada Bhuse Live: सर्व माध्यमाच्या शाळेत मराठी शिकवणे बंधनकारकसर्व माध्यमाच्या शाळेत मराठी शिकवणे बंधनकारक केल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण नुसार वेळोवेळी कागदपत्रे आकडेवारी, पाठीमागचा प्रवास याची माहिती दिली आहे. मराठी आपली मातृभाषा, राज्यभाषा आणि मोदींच्या मार्गदर्शन खाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. ही अभिमानची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
Hindi Controversy Live: महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलं, खासदार अरविंद सावंत यांची टीकाखासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवरा टीका केली आहे. “महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलं. मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे असा आग्रह धरायला पाहिजे. मात्र भाजपमधील नेत्यांना मराठीचं प्रेम नाही”, अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Wardha Live : निमसडा येथे शेतीच्या वादातून हत्याकांड; काकू आणि चुलत भावाला संपविले; आरोपीचीही आत्महत्याहिंगणघाट तालुक्यातील निमसडा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या जुन्या वादातून पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली.
Solapur Live : कसबा पेठेत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मूर्तीच्या महापूजेच आयोजनसोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील कसबा पेठेतील ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या आद्य विठ्ठल मूर्तीची आषाढी एकादशी निमित्त महापूजा करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. माढयाच्या नगराध्यक्षा मीनल साठे व उपस्थित भाविक भक्तांच्या हस्ते पहाटे चार वाजता श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात येणार आहे. महापूजेचे पौराहित्य बापू कुंभेजकर हे करणार आहेत. या निमित्ताने मंदिर परिसराची स्वच्छता, मंदिरावरती विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. मंदिराची फुलांनी सजावट करण्यात येत. आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी भाविक भक्तांची लगबग सुरू आहे. महापूजेनंतर शहरातून पारंपारिक वाद्य वाजवत पालखीची नगरप्रदक्षिणा करण्यात येते.
Dhule Live : धुळ्यात चार चैन तपस्वींचे आगमनलवकरच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. धुळे जिल्ह्यातील कुसुंबा नगरीतील प्राचीन दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर चार तपस्वींचे आगमन होणार आहे. तपस्वी भर पावसात मजल दरमजल करीत महामार्गावरून कुसूंब्याकडे वाटचाल करीत चालत आहेत. भर पावसातही त्यांचे मार्गक्रमण सुरु आहे.
Live : "हिंदी मला येत नाही मी हिंदी बोलणार नाही"- आदिवासी मंत्री अशोक उईकेमुंबईमध्ये हिंदी सक्ती विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केलं. "हिंदी मला येत नाही मी हिंदी बोलणार नाही. मी फक्त मराठीत बोलणार. माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अनपड आहे. माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले मी तेच बोलणार." असं ते म्हणाले.
Live: तवांग चू नदीवर अरुणाचलचा पहिला स्टे केबल ब्रिज उभारणीतअरुणाचलमधील तवांग जिल्ह्यातील तवांग चू नदीवर राज्याचा पहिला स्टे केबल ब्रिज उभारला जात आहे.
सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाची झेप!
Live: भारतीय फुटबॉल प्रशिक्षकांसाठी AIFF कडून रणनीती व विश्लेषण कौशल्यवृद्धीची संधीअखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) फुटबॉल हाऊस, नवी दिल्ली येथे १४ जुलै रोजी ‘हाय-इंपॅक्ट परफॉर्मन्स अॅनालिसिस’ या कार्यशाळेचे आयोजन करीत आहे.
ही कार्यशाळा भारतीय फुटबॉलमधील प्रशिक्षक आणि विश्लेषकांच्या टॅक्टिकल (रणनीतिक) आणि विश्लेषणात्मक कौशल्यांना अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी आहे.
Solapur Live: सोलापूरमध्ये ७ ते ११ जुलै दरम्यान कुक्कुट पालन प्रशिक्षण; प्रवेशासाठी ५ जुलैपर्यंत मुदतजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सोलापुरातील नेहरूनगर येथील सघन कुक्कुट विकास गट येथे 5 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षण ७ ते ११ जुलै दरम्यान होणार आहे.
प्रवेश घेऊ इच्छीत असलेल्यांनी 27 जून ते 5 जुलै या कालावधीत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एल. एन. नरळे यांनी केले आहे.
या प्रशिक्षाणार्थ्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी 200 रुपये आकारण्यात येईल.
सोबत शाळा सोडण्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, गुणपत्रक व पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक आहे.
Parbhani Live : परभणीतील शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक संपन्नपरभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक श्री क्षेत्र पोखरणी नरसिंह येथे पार पडली या बैठकीला बाधित ३१ गावातील प्रत्येकी २ शेतकरी उपस्थित होते यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची मोजणी आणि भूसंपादन करू दिले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय तसेच वेळ पडली तर टप्प्याटप्प्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णयही या शेतकऱ्यांनी घेतलाय
हिंदी सक्तीविरोधी आंदोलनात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणारहिंदी सक्ती सरकारी निर्णय,फडणवीसी आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जालन्यातील परतूर येथे शिवसेना ठाकरे गटाने निषेध आंदोलन केल.नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले, तुझ्या आईचा आणि बापाचा पेन्शन बबनराव लोणीकरने दिला असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं होतं.
5 जुलैच्या मोर्चात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सहभागी होणारसंस्थांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी आणि मराठीप्रेमींनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
शासनाच्या निर्णयाविरोधात पाच जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय
भविष्यात महाराष्ट्राची मराठी भाषक राज्य म्हणून असणारी ओळख पुसट होणे ही राज्याची सर्वांत मोठी हानी ठरेल, मंडळाचे मत
हिंदी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरेंनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता सहभागी होणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहिर केले आहे. हा विरोधी पक्षाने काढलला मोर्चा असल्याचे सांगताना राष्ट्रवादीच्या या बाबत काही भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढणार असल्याचे तटकरे म्हणाले.
Live Update: संत नामदेव महाराज पालखी बीड जिल्ह्यातल्या जवळबंद इथं दाखलसंत नामदेव महाराज पालखी बीड जिल्ह्यातल्या जवळबंद इथं दाखल झाली आहे.
Live : भंडारा जिल्हा दूध संघ निवडणूक आज; शिंदे गटाची काँग्रेससोबत आघाडी, भाजप-राष्ट्रवादी युतीला टक्करभंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी ८ वाजता सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी केली आहे.
एकूण १६९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, १२ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून, मतमोजणी सायंकाळी उशिरा पार पडणार आहे.
सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत परंपरागत भाजप-राष्ट्रवादी युती विजय मिळवते का, की शिंदे गट आणि काँग्रेसची आघाडी सत्ता मिळवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Live : अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवलाप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने बॉलीवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम; महापालिकेची मोठी तयारीछत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून मुख्य रस्त्यांवरील सर्व अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात तयारी केली असून, सुमारे 350 हून अधिक कर्मचारी, 200 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, तसेच 20 पेक्षा जास्त जेसीबी, पोकलेन, हायवा, ट्रक, ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि कोंडवाड्याची व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
थोड्याच वेळात ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होणार आहे.
Pune Live : पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद; संभाजी ब्रिगेडकडून 'राजमाता जिजाऊ' नावाची मागणीपुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून 'राजमाता जिजाऊ रेल्वे स्टेशन' करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत आहे.
या मागणीसंदर्भात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाले असून, या नामांतरावरून सध्या तीव्र वाद निर्माण झाला आहे.
Pune Live : पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोडपुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत फोडल्या गाड्या
सिंहगड रोड परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड
आज पहाटे अज्ञातंकडून करण्यात आली गाड्यांची तोडफोड
दारूच्या नशेत अज्ञात डोळक्याने तोडफोड केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती
पुण्यात सिंहगड रोड परिसरात अज्ञात टोळक्याकडून हैदोस
Nagpur Live : देशातील पहिला 'संविधान प्रास्ताविका पार्क'चं उद्घाटनदेशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपूर विद्यापीठाच्या 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ' कॉलेजच्या परिसरात उभारण्यात आला आहे... संविधान प्रास्ताविका पार्क
पार्कच्या प्रवेशद्वारावर सांची स्तूप येथील प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे...
Nashik Live : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला- सकाळी १० वाजेपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला
- २,७२० क्यूसेकवरून २,०४० क्यूसेकपर्यंत विसर्ग घटवला
- सद्यस्थितीत सकाळी १० वाजल्यापासून धरणातून २,०४० क्यूसेक वेगानं विसर्ग
- नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी देखील होणार कमी
Crime News : वैजापुरात किर्तनकार महिलेची दगडाने ठेचून हत्यावैजापुरात महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या. ह.भ.प. संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकर्याकडून हत्या करण्यात आलीय. आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराच्या हत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडालीय. हत्या का आणि कुणी कशासाठी केली अजून अस्पष्ट आहे.
Nagpur : डिजिटल अरेस्ट करत ८१ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला २६ लाखांचा गंडाडिजिटल अरेस्ट करून 81 वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी घातला 26 लाखांचा गंडा
- पीडित हे सरकारी विभागातून 24 वर्षा अगोदर सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना 30 एप्रिल रोजी मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला
- ती व्यक्ती सायबर क्राईम मधील तथाकथित अधिकारी असल्याची बतावणी करत जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल मनी लॉन्ड्रीग प्रकरणात पीडिताचे एटीएम कार्ड सापडल्याचा दावा केला.
त्यानंतर दोन दिवसांनी गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉल करून आयपीएस अधिकारी बोलत असल्याचे सांगून अटकेची भीती दाखवली
Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात साथीच्या आजारांना सुरुवातरत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुसरीकडे पावसाळ्यात साथीचे आजार पसरले आहेत. साथीच्या आजारांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात ओपीडी हाऊसफुल झाली असून दररोज रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात ही रुग्णांच्या गर्दीत वाढ झाली आहे. पावसाळा आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो.
Nashik : ठाकरेंना आणखी एक धक्का, पदाधिकारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश- नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का
- महानगरप्रमुख विलास शिंदे करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
- उद्या रविवारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
- विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक, पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती
- काल विलास शिंदे यांच्या जाहीर नाराजीनंतर त्यांना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंची भंडाऱ्यात आज आभार सभाविधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने विजयी केले. या विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडाऱ्यात येणार आहेत. मात्र, हवामान विभागाने याठिकाणी येलो अलर्ट जाहीर केला आहे. शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ९२ पोलीस अधिकारी आणि ५६८ पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
Pune : पुण्यातल्या ४ धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा चारपट जास्त पाणीपुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये २७ जून सकाळपर्यंत १३.१६ टीएमसी (४५.१३%) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी केवळ ३.५७ टीएमसी (१२.२४%) साठा होता. मागील २४ तासांत ४८७ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची नोंद झाली आहे.
Nagpur : रेल्वेनं फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात १.७२ लाख केले वसूल- रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून एकाच दिवसात 1.72 लाख रुपयांचा दंड वसूल
- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील तिकीट निरीक्षक आलोक कुमार झा यांनी वसूल केला एकाच दिवसात लाखोंचा दंड
- विशेष म्हणजे ट्रेन क्रमांक 03251,दानापूर ते बंगलोर स्पेशल ट्रेन या एकाच गाडीतून तब्बल 220 फुकट्या प्रवाशांकडून अलोक कुमार झा यांनी हा दंड वसूल केला आहे
Bangalore Stampede : चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीबाबत पुढील आठवड्यात अहवाल सादर होणारबंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या (आरसीबी) विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीबाबत शहर जिल्हा दंडाधिकारी जगदीश पुढील आठवड्यात अहवाल सादर करण्याची तयारी करत आहेत. सरकारने तपास अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची दिलेली मुदत वाढवण्याची परवानगी दिल्यानंतर तपास अधिकारी जगदीश यांनी दुर्घटनेच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांना अनेकवेळा नोटिसा बजावल्या होत्या. अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ घेतला होता. हजर झालेल्या दोघांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. माजी शहर पोलिस आयुक्त दयानंद हे त्यांच्या वकिलासह खासगी कारने के. जी. रोडवरील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात आले. चेंगराचेंगरीचे कारण काय होते? परवानगी नसतानाही आरसीबीला विजय साजरा करण्याची परवानगी का देण्यात आली? चिन्नास्वामी स्टेडियमजवळ सुरक्षेसाठी किती पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते? अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली असतानाही प्रवेशद्वारासमोर अधिक पोलिस अधिकारी का तैनात करण्यात आले नाहीत, असे प्रश्न विचारले. आरसीबी, डीएनए आणि केएससीएच्या प्रमुखांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. वरिष्ठ कायदा आणि सुव्यवस्था पोलिस आणि वाहतूक पोलिसांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे कळते. तपासणीत असे दिसून आले की, प्रवेशद्वारासह मोक्याच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावले नव्हते. पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते. शेवटच्याक्षणी मोफत प्रवेश जाहीर करण्यात आला होता.
Canara Bank : मनगोळी कॅनरा बँक लूटप्रकरणी व्यवस्थापकासह तिघांना अटकबंगळूर : कॅनरा बँकेच्या मनगोळी शाखेत ५३.२६ कोटींचे सोने आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. बँक व्यवस्थापक विजयकुमार मिरियाल (वय ४१) आणि त्याचे सहकारी चंद्रशेखर नेरेला (३८) आणि सुनील नरसिम्हालू मोका (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या दोन मोटारी आणि वाहनांमधून नेलेले १०.५ किलो सोने जप्त केले आहे.
Kiren Rijiju : किरेन रिजिजू निवडणार भाजप प्रदेशाध्यक्ष, पक्षाकडून निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीनवी दिल्ली : राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वी भाजपला विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Satara Water Supply : साताऱ्यात पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणारसातारा : शहापूर योजनेच्या विद्युत वाहिनीच्या स्थलांतरणाचे काम वीज वितरण कंपनीकडून हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शहापूर योजनेतून पाणी उपसा होऊन पुरेशी पाणीपातळी उपलब्ध होणार नाही. यामुळे मंगळवार (ता. एक जुलै) आणि बुधवार (ता. दोन जुलै) या दोन दिवशी या योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Ashadhi Wari : श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू राहणारपंढरपूर : आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला आजपासून सुरवात झाली आहे. आषाढी वारीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी शुक्रवारपासून (ता. २७) श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. प्रक्षाळपूजेपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुले राहणार आहे.
Kolhapur News : दहा जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेशकोल्हापूर : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा आदी प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच विविध पक्षांकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात २८ जून ते १० जुलैपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी बंदी आदेश जारी केला आहे.
Almatti Dam : आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात १० जुलैला मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी यांची माहितीकोल्हापूर : ‘महापूर नियंत्रणासाठी येणाऱ्या पैशांचे वाटोळे केले जात आहे. जागतिक बँकेकडून पैसे मिळतात म्हणून गटारी साफ करत असला तर कायमच पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात बसावे लागणार आहे. हिप्परगी आणि आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात १० जुलैला सकाळी साडेअकरा वाजता सांगली पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.
Shefali Jariwala : काटा लगा गर्ल अन् बिग बॉस फेम शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधनLatest Marathi Live Updates 28 June 2025 : काटा लगा गर्ल आणि बिग बॉस १३ मधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला. तसेच ‘मराठी’च्या मुद्यावरून ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झाले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे भाऊ तब्बल अठरा वर्षांनंतर प्रथमच प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा सूत्राच्या विरोधात एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत. या दोन्ही बंधूंनी हे युतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्राला या मोर्चाच्या निमित्ताने पाच जुलै रोजी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य विभागाला गरज नसतानाही नर्सिंग महाविद्यालयासारख्या अनेक महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. अशा अडीचशे संस्थांना परवानगी दिली आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्याचा अभ्यासही आम्ही करीत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदावरून संजय पवार यांना हटवून कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तर, कोल्हापूर दक्षिण प्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची व कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे यांची नियुक्ती झाली. हिप्परगी आणि आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात १० जुलैला सकाळी साडेअकरा वाजता सांगली पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिली. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वी भाजपला विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..