Ashok Uike : माझं शिक्षण मराठीचं! हिंदी नाही येत... मंत्री उईकेंची स्पष्ट भूमिका
esakal June 29, 2025 04:45 PM

पुणे : ‘‘माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला. आई अशिक्षित होती. तिने माझ्यावर मराठीचे संस्कार केले, म्हणून मला तीच भाषा येते. हिंदीला विरोध नाही; मात्र मला हिंदी येत नाही, मी मराठीच बोलतो,’’ असा पवित्रा आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी घेतला.

शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीवरून वाद सुरू असताना भाजपचे मंत्री उईके यांनी हिंदीत बोलणार नसल्याचे सांगितल्याने चर्चेचा मुद्दा ठरला. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर उईके यांना काही पत्रकारांनी हिंदीमध्ये माहिती देण्याबाबत विचारले होते.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी कमी झाला नसल्याचा आणि भविष्यातही तो कमी होणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळविल्याचा आरोप झाला होता.

JSW Steel Plant: ‘जेएसडब्ल्यू’ ला देऊ नका सुपीक जमीन; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे,प्रशासन शोधणार पर्यायी जागा

मात्र, महायुती सरकारच्या काळात आदिवासी विभागाचा निधी कमी झालाच नाही, असे उईके यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आदिवासी विकास विभागाचा निधी २०१४-१५मध्ये १४ हजार कोटी होता.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.