Maharashtra Politics : भाजप शहराध्यक्षावर वीज चोरीचा आरोप, काँग्रेसची बॅनरबाजी
Sarkarnama June 29, 2025 08:45 PM
भाजप शहराध्यक्षावर वीज चोरीचा आरोप, काँग्रेसची बॅनरबाजी

भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर स्वतःच्या कार्यालयीन उपयोगासाठी वीज चोरी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन देखील छेडले होते त्यानंतर आता काँग्रेसकडून शहरात फ्लेक्स बाजी करत धीरज घाटेंवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. बोला अण्णा,बोला ताई अशा प्रकारचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत.

ठाकरे बंधुंना मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही - अजित पवार

हिंदी सक्ती विरोधात पाच जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित पाच जुलैला मोर्चा काढणार आहेत. मात्र ठाकरे बंधुंना मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही, असे मोठे विधान अजित पवार यांनी केले आहे. मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. तसेच हिंदी सक्तीबाबत माझी भूमिका स्पष्ट असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

मोठी बातमी! जगन्नात यात्रेत चेंगराचेंगरी, तीन ठार

ओडिशामधील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान शुक्रवारी (दि. २७ जून) रात्री रथ ओढताना चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये तब्बल 500 पेक्षा अधिक भक्त जखमी झाली होते. तर आठ जणांची प्रकृती गंभीर होती. यातील तीन भक्तांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंना नाशिमध्ये मोठा धक्का, आठ माजी नगसेवकांसह महानगर प्रमुखही शिंदेंसोबत

उद्धव ठाकरेंना नाशिमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केलेले माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह 8 माजी नगरसेवकांसह करणार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठाण्यात होणार आहे. प्रवेशासाठी नाशिकहून शेकडो वाहनांचा ताफा शक्तिप्रदर्शन करत ठाण्याकडे होणार रवाना झाला आहे. विलास शिंदे आणि 8 माजी नगरसेवकांसह 12 जिल्हा परिषद सदस्य,40 हून अधिक सरपंच,जिल्हा बँक,बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सहायक पोलीस उपनिरीक्ष हत्या, तिघांना अटक

आधी अंगावर चारचाकी घालून उडवले त्यानंतर वार करून सहायक पोलिसांची वार करून हत्या करण्यात आली, ही घटना अमरावतीमध्ये घडली. हत्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव अब्दुल कलाम असे आहे. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन ) आणि आवेज खान अयुब खान यांनी अटक केले आहे. नेहमी हत्येचे कारण काय हे स्पष्ट झाले नाही. अमरावती पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी हत्या करणारे दोन जिआन आणि आवेज हे 22 वर्षांचे आहेत. तर, फाजील खान साबीर खान याला ख्वाजानगरमधून  जखमी अवस्थेत ताब्यात घेतण्यात आले होते. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.