पनवेलमध्ये चंदुकाका सराफचा भव्य शुभारंभ
esakal June 30, 2025 01:45 AM

पनवेल, ता. २९ (बातमीदार) : १९८ वर्षांची सुवर्णपरंपरा लाभलेली चंदुकाका सराफ ही सुवर्णपेढी आता पनवेलमध्ये येत आहे. ४ जुलैला सकाळी ११ वाजता पनवेल येथील नील हेर्मिटेज, सुरुची हॉटेलजवळ नव्या पेढीचा शुभारंभ होत आहे. या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत. चंदुकाका सराफ स्टोअरमध्ये ४ ते ९ जुलैदरम्यान ३० हजार किंवा त्याहून अधिक खरेदी व तीन हजार रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. विजेत्या ग्राहकांना महिंद्रा थार किंवा ज्युपिटर बाइक मिळणार आहे. त्याचबरोबर सोन्याच्या घडणावळीवर १० टक्के आणि हिऱ्याच्या घडणावळीवर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. सर्व ग्राहकांनी चंदुकाका सराफ यांच्या नव्या पेढीला भेट द्यावी आणि दागिने खरेदीवर ज्युपिटर बाइक व महिंद्रा थार जिंकण्याची संधी मिळवावी, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.