ZIM vs SA, Test: वर्ल्ड चॅम्पियन द. आफ्रिकेवर भारी पडला ३८ वर्षांचा खेळाडू! कसोटी शतक ठोकत नोंदवला मोठा विक्रम
esakal June 30, 2025 03:45 AM

दक्षिण आफ्रिका संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिलेली असताना दक्षिण आफ्रिकेकडून युवा खेळाडू खेळताना दिसत आहेत.

दरम्यान, बुलावायोला सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने १६७ धावांची मोठी आघाडी घेतली आहे. पण असे असले तरी त्यांना पहिल्या डावात झिम्बाब्वेचा ३८ वर्षीय सीन विल्यम्स नडला होता.

ZIM vs SA 1st Test : ३-२३! झिम्बाब्वेसमोर WTC चॅम्पियन्स दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले;Tanaka Chivanga ची भन्नाट गोलंदाजी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव ९० षटकात ९ बाद ४१८ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वे संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला. पण झिम्बाब्वेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी तकुडझ्वानाशे कैतानो (०) आणि निक विल्च (४) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. त्यांना पदार्पणवीर कोटी युसूफने बाद केले.

तसेच सलामीवीर ब्रायन बेनेट (१९)रिटायर्ड हर्ट झाल्याने बाहेर गेला. पण नंतर सीन विल्यम्सला कर्णधार क्रेग इर्विनची साथ मिळाली. त्यांच्यात चांगली भागीदारी झाली होती. पण इर्विनला केशव महाराजने ३६ धावांवर बाद केले.

नंतर काही काळ वेसली मधवेरेने विल्यम्सची साथ दिली, पण मधवेरेलाही विआन मुल्डरने १५ धावांवर पायचीत केले. नंतर मुल्डरने प्रिन्स मस्वरे (७) आणि तफाद्झ्वा त्सिगा (९) यांनाही बाद केले. कोडी युसूफले वेलिंग्टन मसाकद्झालाही ४ धावांवर बाद केले. तरी विल्यम्सने एक बाजू भक्कम सांभाळलेली होती. त्याला नंतर विन्सेंट मासेकेसाने काही वेळ साथ दिली.

पण शतक केलेला विल्यम्सच अखेर ६६ व्या षटकात बाद झाला. त्याने १६४ चेंडूत १६ चौकारांसह १३७ धावांची खेळी केली. त्याने १२२ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. हे विल्यम्सचे ६ वे कसोटी शतक होते. त्यामुळे त्याने मोठा विक्रम केला.

सीन विल्यम्सचा विक्रम

सीन विल्यम्स आता झिम्बाब्वेकडून सर्वाधिक शतके करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने ग्रँट फ्लॉवर आणि ब्रेंटन टेलर यांची बरोबरी केली आहे. ग्रँट फ्लॉवर आणि टेलर यांनीही कसोटीमध्ये प्रत्येकी ६ शतके केली आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर अँडी फ्लॉवर असून त्यांनी १२ शतके केली आहेत.

याशिवाय सीन विल्यम्स दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत शतक करणारा झिम्बाब्वेचा दुसराच फलंदाज आहे. यापूर्वी अँडी फ्लॉवर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन शतके केली होती.

ZIM vs SA, Test: पदार्पणाच्या कसोटीतच १९ वर्षीय प्रिटोरियसचा धुमाकूळ! द. आफ्रिकेसाठी दीडशतक ठोकत ६१ वर्षे जुना विक्रमही मोडला झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद

सीन विल्यम्स बाद झाल्यानंतर मुझराबनी आणि तनाका चिवंगा हे देखील झटपट बाद झाले. ते शून्यावर बाद झाले. त्यामुळे झिम्बाब्वेचा पहिला डावही ६७.४ षटकात २५१ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी मिळाली. मसेकेसा ११ धावांवर नाबाद राहिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.