Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडचं लग्न ठरलं का? एका फोटोवरून सोशल मीडियावर होतेय चर्चा
Saam TV July 01, 2025 01:45 AM

टिव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ताने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्राजक्ताचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता तिच्या फॅन्सना अपडेट देत असते. नुकतंच प्राजक्ताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यावरून तिच्या लग्नाची चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.

Tanvi The Great Trailer: 'अलग हूं पर कमजोर नहीं'; अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजातील साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने #पाहुणे_मंडळी #96k #maratha असं म्हटलं आहे यामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लग्न करणार की काय अशी एकच चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची निळी बॉर्डर असलेली साडी परिधान केली आहे. खाद्यांवर पदर घेत अभिनेत्री एखाद्या नवरीसारखीच बसलेली दिसत आहे. केसात गजरा, हातावर मेहंदी देखील प्राजक्ताने काढली आहे. प्राजक्ताच्या आजूबाजूला पाहुणी मंडळी दिसत आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोवर चाहत्यांनी कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या एका चाहत्याने तिचं ठरलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर आणखी एकाने,

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: 'क्योंकी सास भी कभी बहू थी २'ची प्रदर्शन तारिख बदलली; मिहिरने सांगितले लाँच रद्द करण्याचे कारण
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.