राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या विश्वमांगल्य सभा यांच्यावतीने शिर्डीमध्ये जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाअंतर्गत दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.. या चर्चासत्रासाठी देशभरातील अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींच्या परिवारातील महिला सदस्य उपस्थित होत्या.. राजकारणात काम करत असताना कुटुंबात संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवाभाव अधिक वाढवण्यासाठी या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले..
जळगावला ५०० रु. च्या बनावट १२ नोटा जप्त अन्य ४८ नोटा बाजारात खर्च५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या शहरातील दोघा तरुणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजार रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या १२ बनावट जप्त केल्या. विशेष म्हणजे, या दोघांनी एकूण ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथून आणल्या. त्यापैकी २४ हजार रुपये जळगावात खर्च केल्याची कबुली त्यांनी पोलिसांनी दिली. दरम्यान, त्यांच्यासमवेत आणखी एक जण असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. दोघे ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगून होते. ते या नोटा चलनात आणण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना जिल्हा रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी आणखी एका संशयिताचे नाव सांगितले. त्यालाही अटक केली. तिघे जण पोलिस कोठडीत आहेत. दोघांनी २४ हजारांच्या म्हणजेच ४८ नोटा जळगाव शहरात विविध ठिकाणी खर्च केल्याची माहिती दोघांच्या चौकशीतून पुढे आली आहे.
४००० रुपये शेकडा विकली जातेय कोथिंबीरनाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकावर त्याचा परिणाम होऊन भाज्यांच्या दरात वाढ झाली,मनमाड जवळच्या रायपूर येथिल शेतक-याने अडीच एकरात कोथंबीरची लागवड केली असून ही कोथंबीर घेण्यासाठी व्यापारी थेट बांधावरच येत असल्याने त्याला ४००० हजार रुपयाचा दर मिळाला आहे,विशेष म्हणजे ही सर्व कोथंबीर गुजरात,मध्यप्रदेश येथे विक्रीला जात असल्याने दर सुध्दा चांगला मिळत असल्याच व्यापारी सांगतात.
शक्तीपीठ महामार्ग विरोधात १ जुलै रोजी कोल्हापुरात महामार्ग रोको आंदोलन ; आंदोलन यशस्वी करण्याचा इंडिया आघाडीचा निर्धारशक्तीपीठ महामार्ग विरोधात १ जुलै १२ जिल्ह्यातील शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. कोल्हापुरात देखील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. महामार्ग रोको आंदोलन संवेदनिक आणि शांततेत पार पाडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मात्र पोलिसांनी दडपशाही करू नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील. असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर भाताण बोगद्यात कारने पुढे चाललेल्या मोटार सायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. रोहित कदम असं अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.
एसटी चालकांच्या माथी एक कोटी 33 लाखांचा दंडपुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसचा अतिवेग आणि लेनकटिंग आदी कारणांमुळे गेल्या सहा महिन्यात राज्याच्या मोटर परिवहन विभागाने 1 कोटी 33 लाख 34 हजार इतका दंड एसटी महामंडळाला केला आहे. कोल्हापुरातील एसटीला 13 लाख 80 हजार इतका दंड झाला आहे. नियमानुसार दंड वाहनाच्या मालकाला केला जातो. असे असूनही या दंडाची वसुली मात्र एसटी महामंडळाने एसटी चालकाच्या वेतनातून करणे सुरू केली आहे. त्यामुळे महामंडळाचे सचिव नामानिराळे राहिल्या असून कमी वेतनाच्या चालकांना मात्र दंडाचा फटका बसला आहे.
मान्सूनने नऊ दिवस आधीच व्यापला संपूर्ण देशराज्यात 5 जुलैपासून वेग घेण्याची शक्यता,हवामान विभागाची माहिती
यंदा मान्सूनने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढत सर्व राज्य विक्रमी वेळेत पादक्रांत केली..
संपूर्ण देश व्यापण्याची तारीख ही 8 जुलै आहे मात्र यंदा नऊ दिवस आधीच 29 जून रोजी मान्सूनने अवघा देश व्यापला आहे
राज्यात मान्सून 5 जुलै पासून वेग घेईल तोवर मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
३० लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना ६ टक्के करइतर इंधनावरील वाहनांसाठी एक टक्का कर आकारणी
एक जुलैपासून ३० लाख रुपयांपुढील इलेक्ट्रिक वाहने आणि पेट्रोल-डिझेलवर आधारित वाहनांच्या किमती वाढणार आहेत.
राज्याच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार उद्यापासून (१ जुलै) ३० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर राज्य सरकारकडून आकारला जाणार आहे
तर सीएनजी-एलपीजी, पेट्रोल-डिझेल इंधनावरील वाहनांसाठी मोटार वाहन कर एक टक्का अधिक आकारण्यात येणार आहे.
Maharashtra Live News Update : तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द - फडणवीसराज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले दोन शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर आज निर्णय येणार- नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता
- नागपूर सत्र न्यायालयाने फहीम खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण केली...
- दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला...
- मुख्य आरोपींसह ८० आरोपीचे जामीन अर्ज
- नागपूर हिंसाचारानंतर पोलिसांनी फहीम खानला अटक केली होती, त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल...
परंडा शहरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत, दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दीटाळ मृदंगाचा गजर,हरीनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे रवीवारी सायंकाळी धाराशिव च्या परंडा शहरात आगमण झाले यामुळे मोठ्या भक्तिभावाने नागरीकांनी पालखीचे स्वागत केले.पैठनहुन १८ जुन रोजी निघालेल्या या पालखी सोहळा परंडा शहरात दाखल होताच प्रशासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करत स्वागत केले या पालखीचा राञी परंडा येथील पाटील वाड्यात मुक्काम होता या ठिकाणी परंपरेनुसार भजन किर्तन हरीजागर पार पडला आज सकाळी १० वाजता ही पालखी मुंगशी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
हिंदी सक्तीचे जीआर रद्द केल्यानंतर उल्हासनगरात मनसेचा जल्लोषमहायुती सरकारने तीव्र विरोधानंतल अखेर हिंदी सक्तीचे जीआर रद्द केले. त्यानंतर उल्हासनगर मनसेचा जल्लोष पाहायला मिळाला, मनसेकडून शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत रात्री दहा वाजता फटाक्यानची आतिषबाजी करून पेढे वाटत आनंद साजरा केला, तसेच मराठी बहुल मराठा सेक्शन येथील जिजामाता उद्याना समोर फटाके फोडून आनंद साजरा केला,मनसेचे जिल्हा संघटक बंडू देशमुख तसेच राज्य उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला.
रावेर तालुक्याती वादळी तडाखा, महिन्यात तिसऱ्यांदा केळी बागा आडव्या,रावेर आणि यावल तालुक्याला रविवारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यात रावेर तालुक्यात केळी नुकसान झाले असून महिनाभरात तिसऱ्यांदा वादळामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. रावेर तालुक्यातील शेती शिवारात ३४२ हेक्टरवर ६८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नेमका तोंडी आलेला घास हिरावल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत कृषी विभागाने प्राथमिक अंदाजाची आकडेवारी महसूल प्रशासनाकडे माहिती दिली आहे.
उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथे जैन मंदिरात चोरी, मंदिरातील घंटा आणि मुर्ती गेली चोरीलाधाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडलीय. अज्ञात चोरट्याने मंदिरात बांधलेली पितळी घंटी व"नंदीश्वर"देवाची मूर्ती चोरुन नेली आहे. या प्रकरणी उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस करत आहेत.
पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजलीआषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली आहेत. येथील विणे गल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते.
वारकरी संप्रदायामध्ये वीणा,टाळ आणि पखवाज या वाद्यांना महत्वाचे स्थान आहे. किर्तन आणि भजनामध्ये तर विण्याचे स्थान आग्रभागी असते. वारी काळात वीणा वाद्याला मोठी मागणी असते. याशिवाय पखावाज आणि टाळांना ही मागणी असते. पंढरपुरात सर्व प्रकारचे भजनी साहित्याची निर्मिती व विक्री केली जाते. कच्च्या मालाचे व मजूरी दरात वाढ झाल्याने यंदा भजनी साहित्यामध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रामेश्वर कोकाटे या विक्रेत्यांनी सांगितले.
जनसुरक्षा कायद्या विरोधात आज डाव्या पक्षांचे आंदोलन, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची माहितीजनसुरक्षा कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांतर्फे आज मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. जनसुरक्षा असं गोंडस नाव दिलं असलं तरी या विधेयकामुळे सर्वसामान्यांच्या घटनात्मक अधिकारावर गदा येणार आहे. सामाजिक चळवळी, जनआंदोलने आणि विरोधीपक्षांना दडपण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाणार आहे असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.
यवतमाळ जिल्ह्यातील 15 प्रकल्पांमध्ये अजूनही ठणठणाटयवतमाळ जिल्ह्यात यावर्षी उन्हाचा चटका वाढला त्यातही पावसाने उशिरा हजेरी लावली परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पाचा साठा झपाट्याने कमी झाला सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील 15 लघु प्रकल्प कोरडे आहेत तर मोठ्या प्रकल्पात केवळ 26 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे जिल्ह्यात आणखी मोठा पाऊस बरसल्यास नंतरच प्रकल्पाची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
पिकविम्यासाठी ॲपवर नोंदणी आणि फार्मर आयडी बंधनकारकडिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर पिकाची नोंदणी असेल तर पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय फार्मर आयडी देखील बंधनकारक आहे. कोकणात यंदाच्या खरीप हंगामात भात आणि नाचणी पिकाला विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.