अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षिकेकडून वर्षभर लैंगिक अत्याचार; मद्यपान, नैराश्य घालविण्याच्या औषधांचीही लावली सवय, नेमकं काय घडलं?
esakal July 03, 2025 04:45 PM

मुंबई : एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे सुमारे वर्षभर लैंगिक शोषण करणाऱ्या शाळेच्या शिक्षिकेला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शिक्षिकेने (School Teacher) विद्यार्थ्यास मद्यपान आणि नैराश्य घालविण्याच्या औषधांचीही सवय लावल्याचे तपासात उघड झाले आहे. संबंधित शाळा मध्य मुंबईतील नामांकित असून विविध क्षेत्रांतील वलयांकित व्यक्ती आणि त्यांच्या मुलांनी तिथे शिक्षण घेतल्याचे समजते.

गेल्या वर्षी शाळेतील एका समारंभावेळी ४० वर्षीय आरोपी शिक्षिका पीडित विद्यार्थ्याकडे (Minor-Student) आकर्षित झाली. सुरुवातीला शिक्षिकेकडून होणारी आक्षेपार्ह शारीरिक जवळीक विद्यार्थी टाळत आला; पण एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिने त्याचे मन वळविले. नंतर आपल्या आलिशान कारमधून त्याला नेऊन त्याचे लैंगिक शोषण केले.

Mumbai Crime : वर्षभर शिक्षिकेने विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवले, मुलाच्या घरच्यांना माहिती असूनही गप्प बसले; नैराश्यात गेल्यावर...

त्यानंतर तिने अनेकदा शहरातील विविध तारांकित हॉटेलमध्ये त्याच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. दरम्यान, शिक्षिका त्यास मद्यप्राशनाची सक्तीही करीत होती. महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात अचानक घडलेल्या अनाकलनीय घटनांमुळे पीडित विद्यार्थी नैराश्यात गेला. त्याचा गैरफायदा घेत शिक्षिकेने त्यास औषधी गोळ्याही दिल्या. संबंधित प्रकार उघडकीस येताच, पोलिसांनी पॉक्सोसह विविध कमलांनुसार गुन्हा नोंदवत शिक्षिकेला अटक केली.

VIDEO VIRAL : लुंगी फिटली तरी बंदूक सोडली नाही; पोलिसाच्या पोराची भाजप नेत्याला थेट धमकी, महिलेवरही धावून जात... पालकांना कल्पना होती!

मुलाच्या वागण्यात अचानक घडलेले बदल लक्षात येताच पालकांनी त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. दोन ते तीन महिन्यांत शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलगा महाविद्यालयात शिकायला गेल्यावर शिक्षिका आपोआपच त्याची पाठ सोडेल, असा विचार पालकांनी केला. मात्र, महाविद्यालयात गेल्यावरही शिक्षिका त्याचा पिच्छा सोडत नसल्याचे लक्षात येताच पालकांनी पोलिसांत तक्रार केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.