Maharashtra Monsoon Session 2025: संजय राऊतांचे टि्वट अन् दोन नगरसेवकांना भाजपमध्ये 'नो एन्ट्री'
Sarkarnama July 03, 2025 07:45 PM
MVA News: मविआला मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गणेश गीते, सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, कमलेश बोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा पक्ष प्रवेश झाला.

Sanjay Raut: बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश थांबवला

उद्धव ठाकरेंच्या दोन नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेशाल खासदार संजय राऊत यांच्या एका पोस्टमुळे ब्रेक लागला आहे. सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश थांबवण्यात आला आहे. आज दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार होते.

'कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन' चौकशी करा : वडेट्टीवार

सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Nashik News : मामा राजवाडे यांची पदावरून हकालपट्टी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक महानगर प्रमुख मामा राजवाडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राजवाडे यांच्यावर आठ दिवसांपूर्वीच ही जबाबदारी देण्यात आली होती. मामा राजवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार होते. त्यांच्या जागी प्रथमेश गीते यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात दोनदा महानगरप्रमुख बदलण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे.

Maharashtra Monsoon Session 2025: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधी पक्षांचे नेते विधीमंडळाच्या पायऱ्यावर घोषणा देत आहे. यात जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार आदींचा समावेश होता. हातात संविधानाची प्रत घेऊन विरोधक आंदोलन करीत आहेत. सरकार वारकऱ्यांना बदनाम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. सुनील बागुल, मामा राजवाडे आदी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आता ठाकरेंकडे चार नगरसेवक उरले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.