PM Modi : 30 वर्षानंतर या देशात जाणारे मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान, थेट सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सम्मानित
GH News July 03, 2025 09:08 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाच्या संसदेला संबोधित केलं. या दरम्यान ते दोन्ही देशांच्या संबंधांबद्दल बोलले. दहशतवाद आणि ग्लोबलवॉर्मिंग या दोन मोठ्या समस्या असल्याच ते म्हणाले. पीएम मोदी दोन दिवसीय दौऱ्यातंर्गत घानामध्ये दाखल झाले. एअरपोर्टवर राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी पीएम मोदींच स्वागत केलं. पंतप्रधान मोदींचा हा पहिला घाना दौरा आहे. तीन दशकात पहिल्यांदाच भारताचा कुठला पंतप्रधान घाना येथे गेलाय. एका कार्यक्रमात राजधानी अक्करा येथे राष्ट्रपती महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घानाचा सर्वोच्च नागरिक सम्मान ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ने सम्मानित केलं. पीएम मोदी यांनी हा पुरस्कार भारताच्या नागरिकांना समर्पित केलं. पंतप्रधान मोदींनी हा अभिमानाचा क्षण असल्याच सांगितलं.

“घाना आणि भारताची भागीदारी आजसाठी नाही, भविष्यासाठी आहे. आत्मनिर्भर इकोसिस्टिम मजबूत बनवण्याचा आमचा उद्देश आहे. या भागीदारीला गती देणं आमच्यासाठी सम्मानाची बाब आहे” असं पीएम मोदी म्हणाले. घानाच्या संसदेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, “भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. आम्ही जागतिक विकासात आधीपासून 16 टक्के योगदान देत आहोत. भारत जगातील तिसऱ्या मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टिमच घर आहे. इनोवेशन आणि टेक्नोलॉजीसाठी जागतिक केंद्र म्हणून उदय झाला आहे. जगाटची फार्मसी म्हणून आम्हाला ओळखलं जातं” असं पीएम मोदी म्हणाले.

भारत आणि घानाची मैत्री शुगरलोफ अनानास पेक्षाही गोड

“भारत आणि घानाची मैत्री प्रसिद्ध शुगरलोफ अनानास पेक्षाही गोड आहे” असं पीएम मोदी म्हणाले. “जागतिक घडामोडी सर्वांसाठीच चिंतेची सबब आहे. अशावेळी भारताची लोकशाही आशेच किरण बनली आहे. भारताची विकास यात्रा ग्लोबल ग्रोथला चालना देणारी आहे” असं पीएम मोदी म्हणाले. “भारत आज विकासाची नवीन स्क्रिप्ट लिहित आहे. भारताच्या अनेक गौरवक्षणांशी आफ्रिकेच कनेक्शन आहे. भारताच चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं, त्यावेळी मी आफ्रिकेमध्ये होतो. आज भारताचा अंतराळवीर मानवतेच्या भल्यासाठी अवकाशात आहे, त्यावेळी सुद्धा मी आफ्रिकेत आहे” असं पीएम मोदी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.