कॉलेजला जाते सांगून गेली लॉजवर, २२ वर्षीय तरुणीचा प्रियकराने चिरला गळा; चादरीत गुंडाळून ठेवलेला मृतदेह
esakal July 03, 2025 09:45 PM

वाराणसीत कॉलेजला जातो सांगून घरातून गेलेल्या २२ वर्षीय तरुणीची प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची घटना घडलीय. २२ वर्षीय तरुणीचं नाव अलका बिंद असं असून ती एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. कॉलेजपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका ढाब्याच्या खोलीत अलकाचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलीस या प्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत.

अलका बिंद ही एमएस्सी बायोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. बुधवारी सकाळी ती कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघाली. मात्र ती तिच्या प्रियकरासोबत कॉलेजपासून जवळच असलेल्या एका ढाब्यावर गेली. तिथे दोघांनी एक खोली भाड्याने घेतली. सायंकाळी अलकाचा प्रियकर तिथून निघून गेला. रात्री ढाब्याच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता अलकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यावर खोलवर वार केल्याचे दिसून आले.

Woman Doctor Ends Life : स्वतःवर ब्लेडने वार करून डॉक्टर महिलेनं संपवलं जीवन, पतीदेखील वैद्यकीय अधिकारी; धक्कादायक कारण समोर...

मिर्जामुराद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकराला अटक करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अलकाच्या हत्येमुळे वाराणसीत तणावाचे वातावरण आहे. स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. योगींच्या राज्यात काय चाललंय असा सवाल विचारला जात आहे.

निर्घृण हत्येची माहिती समजताच अलकाच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी मिर्जामुराद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन सुरू केले. संतप्त जमावाने दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोषींना लवकरच अटक करून त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. शेवटी गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेत रस्ता मोकळा केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.