swt227.jpg
74856
माजगाव ः शेतकऱ्यांना रेनकोट वाटप करताना तहसीलदार श्रीधर पाटील व अन्य.
‘सहयोग’ मंडळाचे कार्य गौरवास्पद
श्रीधर पाटील ः माजगावात शेतकऱ्यांना रेनकोट वाटप.
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. सहयोग ग्राम विकास मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद आहेत. मंडळाने शेतकऱ्यांना इ-पीक व कृषी कार्ड मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी माजगाव येथे केले. शेतकऱ्यांना रेनकोट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
सहयोग ग्राम विकास मंडळ गरड माजगाव, तहसीलदार सावंतवाडी व ग्रामपंचायत माजगाव यांच्यावतीने माजगाव पंचक्रोशीतील १२५ शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी तहसीलदार पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सरपंच रिचर्ड डिमेलो, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष संतोष वेजारे, ग्रामसेवक आनंद परब, सदस्य संजय कानसे, मंडळाचे सचिव बाळकृष्ण राणे, खजिनदार प्रा. नंदीहळ्ळी, सहसचिव बाळू धुरी, सदस्य अक्षता गोडकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सावंत, अशोक धुरी, गीता कासार, ऊर्मिला मोर्ये, मधू कुंभार, माधवी भोगण, विशाखा जाधव, पोलिसपाटील विनोद जाधव आदी उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोडकर यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश विषद करताना, दिवसेंदिवस वाढत चाललेली पडीक जमीन शेतकऱ्यांनी शेतीसाठी उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा (एआय) उपयोग शेतीसाठी करावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. अक्षता गोडकर यांनी केले. आभार प्रा. नंदीहळ्ळी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी माजगाव, इन्सुली, ओटवणे, चराठे या गावांतील १२५ शेतकरी उपस्थितीत होते. सर्व शेतकऱ्यांना मंडळाच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण पवार, तलाठी सोन्सूरकर व माजगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.