IND vs ENG: शुबमन गिलची ऐतिहासिक खेळी, एका डावात अनेक विक्रमांची नोंद!
Marathi July 04, 2025 08:24 AM

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG 2nd Test Cricket Match) दोन्ही संघात 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 रा कसोटी सामना बर्मिंघममध्ये खेळला जात आहे. शुबमन गिलने एजबेस्टनच्या मैदानावर अशी एक ऐतिहासिक खेळी केली, जी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक वर्षे लक्षात ठेवली जाईल (Team india’s new test captain Shubman gill Creat’s History). गिल इंग्लंडच्या मैदानावर भारताकडून सर्वात मोठी कसोटी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 387 चेंडूंचा सामना करत 269 धावांची अविस्मरणीय खेळी केली. या डावात गिलने 30 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

कर्णधार म्हणून देखील कर्णधार गिल भारताकडून सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. एवढंच नाही तर इंग्लंडमध्ये सर्वात मोठी कसोटी खेळी करण्याचा विक्रमही गिलच्या नावावर झाला आहे. त्याने सुनील गावस्कर यांचा 46 वर्ष जुना विक्रम मोडून काढला आहे. तसेच शुबमन गिल (Shubman gill) इंग्लंडमध्ये द्विशतक आणि 250 धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.