इराण-इस्रायल ताज्या संघर्षानंतर इराणी नागरिकांचा जोश हाय आहे. इराणची सरकारी ब्रॉडकास्टिंग एजेंसी IRIB ने जून 2025 मध्ये एक सर्वे केला. त्यानुसार, 57.4 टक्के लोक भविष्यात इस्रायल विरोधात लढाईमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत. पण एक हैराण करणारी बाब दिसली. हे लोक युद्धापेक्षा रोजच्या वापरतीला तीन Apps ना घाबरतात. इराणी जनतेला शस्त्रांपेक्षा Whatsapp, इंस्ट्रग्राम, टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून जास्त भिती वाटते.
इराणी सरकारी ब्रॉडकास्टिंग एजेंसी IRIB ने 32 शहरात सर्वे केला. त्यात 4 हजार 943 लोक सहभागी झाले होते. इस्रायलच्या हल्ल्याला इराणने ज्या पद्धतीने मिसाइल, ड्रोन्सनी उत्तर दिलं, त्याचा अभिमान वाटला, असं 77 टक्के लोकांनी कबूल केलं. 80 टक्के लोकांनी इराणी सैन्याची ताकद मजबूत असल्याच सांगितलं. 13.7 टक्के लोकच इराण-इस्रायल युद्धविरामाविषयी आश्वस्त आहेत.
या तीन Apps बद्दल इतकी भिती का?
सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे 68.2 टक्के लोकांच्या मते, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सएप या Apps चा वापर इराणी नागरिकांच्या हेरगिरीसाठी केला जातोय. या तीन Apps ना पाश्चिमात्य देश आणि इस्रायलच्या गोपनीय नेटवर्कचा भाग मानतात.
इराणच्या एअर डिफेन्सबद्दल काय मत?
या युद्धात इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमने मोठ्या संख्येने इस्रायली मिसाइल्स आणि हेरगिरी करणारे ड्रोन्स नष्ट केले. त्यामुळे लोकांचा सैन्यावरील विश्वास वाढला. 69.8 टक्के लोकांच्या मते एअर डिफेन्स प्रणालीने सुंदर प्रदर्शन केलं. देशाचा बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅम अजून भक्कम करावा, यावर इराणी जनतेच एकमत आहे.