ENG vs IND : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ सामना, कोण जिंकणार?
GH News July 04, 2025 11:06 PM

वूमन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. वूमन्स टीम इंडियाने 28 जूनला स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. वूमन्स ब्रिगडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा उडवला. त्यानंतर नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने 1 जुलैला पहिला तर एकूण दुसरा विजय मिळवला. भारताने हा सामना 24 धावांनी जिंकला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

त्यानंतर आता उभयसंघातील तिसरा सामना हा आज शुक्रवारी 4 जुलैला होणार आहे. महिला ब्रिगेडला हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडची ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी तिसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना मालिकेच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करणार? की इंग्लंड आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

उभयसंघातील तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजून 35 मिनिटांनी टॉस होईल. सामन्याचं आयोजन हे केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडेच भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर इंग्लंडला नाईलाजाने कर्णधार बदलावा लागला आहे. इंग्लंडची नियमित कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे नॅटच्या जागी टॅमी ब्यूमोंट हीला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येईल?

उभयसंघातील तिसरा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.

टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज

हेड टु हेड रेकॉर्ड्स

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया वूमन्स यांच्यात आतापर्यंत 32 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 32 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 22 वेळा भारतावर मात केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.