बँक जॉब न्यूज: बँकिंग क्षेत्रात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने स्थानिक बँक अधिकारी (LBO) च्या 2500 पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 24 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केले जातील. उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट देऊन अर्ज भरु शकतात.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेशी संबंधित किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर, उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार सूट दिली जाईल. एससी आणि एसटी प्रवर्गाला 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षे सूट मिळेल.
भरतीसाठी अर्ज शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे. सामान्य श्रेणी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये ठेवण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागेल. निवड प्रक्रियेबद्दल बोलायचे झाले तर, उमेदवारांची चाचणी तीन टप्प्यात घेतली जाईल. पहिला टप्पा लेखी परीक्षा असेल ज्यामध्ये इंग्रजी, बँकिंग जागरूकता, सामान्य ज्ञान, तर्क आणि परिमाणात्मक अभियोग्यता यासारख्या विषयांवरून 120 प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल.
यानंतर, एक सायकोमेट्रिक चाचणी घेतली जाईल ज्यामध्ये उमेदवाराची मानसिक क्षमता आणि व्यावसायिक विचारसरणी तपासली जाईल. शेवटी, अंतिम निवड मुलाखत किंवा गट चर्चेद्वारे केली जाईल. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची आवड आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे. उमेदवाराकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेशी संबंधित किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असण देखील गरजेचं आहे. इच्छुक उमेदवार 24 जुलै 2025 पर्यंत यासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज केले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा