एकनाथ शिंदे म्हणाले ‘जय गुजरात’, मनोज जरांगेंची ‘खऊट’ प्रतिक्रिया; एका ओळीत मांडली भूमिका
Marathi July 04, 2025 10:25 PM

धाराशिव : पुण्यातील एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) यांनी जय गुजरातचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या भाषणाच्या शेवटी अमित शाहा यांच्यावर स्तुतीसुमने उधळत शेरो शायरी केली. त्यानंतर, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात.. असे म्हणत एकनाथ शिंदेंनी आपलं भाषण संपवंलय. मात्र, एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जय गुजरात (गुजरात) म्हटल्यावरुन आता महाविकास आघाडीचे नेते, प्रवक्ते शिंदेंवर सडकून टीका करत आहेत. तर, महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची पाठराखण केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता, मराठा आंदोलक मनोज जरेंगे पाटील (मनोज जरेंगे) यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात गुजराती बंधू समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन सोहळा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्याहस्ते संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित राहून एकनाथ शिंदेंनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी, भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्रजय गुजरात असे त्यांनी म्हटले. त्यावरुन, वाद निर्माण झाला असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर दौऱ्यावर जात असताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे माध्यमांशी संवाद साधला, दरम्यान मराठा बांधवांच्यावतीने मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी, त्यांनीही एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे यांची खऊट प्रतिक्रिया

”एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हणणं हे चांगलं नाही, माझी प्रतिक्रिया खूप खऊट असते. पण मी ते ऐकलं नाही, त्यामुळे त्याच्यावर आत्ताच बोलणार नाही,” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं. तुम्हाला हिंदी सक्ती करायची तर देशात मराठी सक्ती करा ते होणार का? असा सवालही त्यांनी राज्यकर्त्यांना विचारला आहे.

अजित पवारांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंद ज्यावेळी जय गुजरात म्हणाले तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो. ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो, त्यामुळं ते नेमकं काय म्हणाले याबाबतची माहिती मला नाही. मी असेपर्यंत तरी तिथे असं काही झालं नव्हतं. आपला देश हा अनेक जाती आणि धर्मांमध्ये विखुरला गेला आहे. अनेक भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची मातृभाषा कोणती ना कोणती आहे. आपली मातृभाषा मराठी आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

मोठी बातमी! सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.