मुंबई : राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन्ही नेते उद्या शनिवारी विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. उद्या एकत्रीत विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, या दोन्ही पक्षांनी हिंदी भाषासक्तीला प्रखर विरोध दर्शवला होता. सध्या मुंबईत मराठी-अमराठी वाद पेटलेला आहे. याच मुद्यावरुन भाजपच्या नेत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?,अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल (Naveen Jindal ) यांनी मनसे प्रमुखांना लक्ष्य केलं आहे.
भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?, अशा शब्दांत त्यांनी टीका केलीय. नवीन जिंदाज हे भाजपचे माजी मीडिया प्रमुख राहिले आहेत. सध्याच्या घडीला ते भाजपचे प्रवक्ते आहेत. दिल्ली भाजपची भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. राज ठाकरेंचा बाप काढणारी पोस्ट त्यांनी एक्सवर पिन करुन ठेवलेली आहे. याचबरोबर नवीन जिंदाल यांनी राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या आणखी दोन पोस्ट केलेल्या आहेत. ‘राज ठाकरेंसारख्या सडकछाप गुंडांची जागा तुरुंगात आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी जहाल शब्दांतील पोस्ट त्यांनी लिहिली. राज ठाकरेंमध्ये इतकी हिंमत असेल तर त्यांनी मुंबईतील शांतीदूतांना मराठी भाषा बोलायला लावावी, असं थेट आव्हान जिंदल यांनी दिलं आहे.
भाजपने त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केला आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जावी, अशी भाजपची भूमिका आहे. तर मनसेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचा याला विरोध आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीही भूमिका एकच असल्यानं दोन्ही बंधू एकमेकांच्या जवळ आले आहेत. अशातच उद्या त्यांचा विजयी मेळावा संपन्न होत आहे. याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, आता भाजप नेते नवीन जिंदाल यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. आता त्यांच्या या टीकेला मनसे नेमक्या कोणत्या शब्दात प्रत्युत्र देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा