दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी पतंजलीला डाबर च्यवनप्राशविरुद्ध कोणतीही नकारात्मक किंवा दिशाभूल करणारी जाहिरात दाखवू नये असे निर्देश दिले. डाबरने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी हा आदेश दिला. सध्या पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणात डाबरच्या वतीने वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी युक्तिवाद केला, तर पतंजलीच्या वतीने वरिष्ठ वकील राजीव नायर आणि जयंत मेहता यांनी बाजू मांडली.