Elon Musk : दुश्मनी अजून वाढणार, मस्क मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट ट्रम्पना भिडणार
GH News July 05, 2025 12:06 PM

अमेरिकेचा काल स्वातंत्र्य दिवस झाला. 4 जुलै 2025 हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असतो. याच दिवशी एलन मस्क यांनी X वर केलेली एक पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एलन मस्क हे फक्त अमेरिकेतीलच नाही, जागतिक उद्योग विश्वातील एक मोठं नाव आहे. एलन मस्क अब्जाधीश असले, तरी एवढीच त्यांची ओळख नाही. एलन मस्क हे क्रिएटीव आणि नवनिर्मितीला चालना देणारं व्यक्तीमत्व आहे. मागच्या काही दिवसांपासून एलन मस्क यांचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत खटके उडत आहेत. त्यामुळे मस्क आता राजकीय आखाड्यात उतरण्याचा विचार करतायत. हाच त्यांच्या पोस्टचा अर्थ आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनी केलेल्या पोस्टमध्ये एलन मस्क यांनी अमेरिकेत तिसरा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचाराला हवा दिली आहे. आत्ताच X पूर्वीच्या टि्वटरवर एका सर्वेचा हवाला देऊन त्यांनी आपला विचार मांडला. आपण अमेरिका पार्टी बनवली पाहिजे का? असं त्यांनी X वर लिहिलय.

एका यूजरने यावर कमेंट करताना लिहिलं की, “एलनने तिसरी पार्टी स्थापन करणं हे टेस्ला आणि स्पेस एक्सशी खूप मिळतं-जुळतं आहे. यशाची शक्यता कमी आहे. पण हा प्रयोग यशस्वी ठरला, तर संपूर्ण खेळ बदलून जाईल” मस्कने यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ‘हा केवळ विचार नाही, संभाव्य रणनितीवर सुद्धा काम करु शकतो’

तिसरा पक्ष किती यशस्वी ठरेल?

एलन मस्कचा तिसरा पक्ष स्थापन करण्याचा विचार खूप खास आहे. अमेरिकेत तिसरे पक्ष नेहमीच मर्यादीत राहिले आहेत. मस्कचं नाव आणि ब्रँड व्हॅल्यू त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. त्याशिवाय टेक समुदाय आणि स्वतंत्र वोटर वर्गात मस्कची एक खास छाप आहे. एलन मस्क नवीन पक्ष बनवण्याचा विचार करतोय, याला ट्रम्प यांचा नवा कायदा कारणीभूत आहे. ट्रम्प यांनी या कायद्याला One Big Beautiful Bill नाव दिलय. यात प्रवासी निर्वासन अभियानासाठी मोठं बजेट आहे. त्यामुळे फायनान्शिअल खर्चाशी संबंधित योजनांच 3.3 ट्रिलियन एवढं नुकसान होऊ शकतं. या विधेयकावरुन ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद सुरु झाले. एलन यांनी Department of Government Efficiency (DOGE) च्या हेड पोस्टचा राजीनामा दिला.

ट्रम्पनी मस्कला काय धमकी दिली?

One Big Beautiful Bill वरुन मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर जाहीर टीका केली होती. हे बिल नॅशनल इकोनॉमीसाठी आत्मघातकी ठरेल असं मस्क म्हणाले. सरकारी खर्च आणि अकार्यक्षमतेला यामुळे प्रोत्साहन मिळेल असं मस्क यांचं मत आहे. टेक कंपन्या आणि स्टार्टअपवर चुकीचा प्रभाव पडेल. त्यावरुन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना इशारा दिला होता. त्यांनी मस्क यांच्या कंपन्यांना मिळणारी संघीय सब्सिडी रद्द करण्याचा इशारा दिला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.