rat३p२.jpg-
२५N७४९५१
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरातील प्रभावती पात्ये यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना श्रीराम भावे. सोबत अन्य.
बियाणी बालमंदिरच्या पात्ये सेवानिवृत्त
रत्नागिरी, ता. ३ : येथील सौ. गोदावरीदेवी बियाणी बालमंदिर, भिडे आजी खेळघरातील प्रभावती पात्ये या सेवानिवृत्त झाल्या. भारत शिक्षण मंडळातर्फे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, उपकार्याध्यक्ष चंद्रकांत घवाळी यांच्या हस्ते पात्ये व कुटुंबीयांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
पात्ये या बालविभागामध्ये २० वर्षे सेविकाताई म्हणून कार्यरत होत्या. या प्रसंगी प्रबंधक विनायक हातखंबकर, सतीश दळी, संजय चव्हाण मुख्याध्यापिका धनश्री मुसळे, प्राजक्ता कदम, जानकी घाटविलकर, रिक्षा संघटनेचे मिलिंद आदी उपस्थित होते.