ENG vs IND : इंग्लंडं-इंडिया तिसर्‍या सामन्यातून कॅप्टन दुखापतीमुळे आऊट, टीमला झटका
GH News July 04, 2025 03:05 AM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 3 संघांमध्ये व्हाईट आणि रेड बॉलचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवयाला मिळत आहे. अंडर 19, वूमन्स आणि मेन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहेत. मेन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर अंडर 19 टीम इंडिया 5 मॅचच्या यूथ वनडे सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. तर हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग 2 सामने जिंकले आहेत. भारताने यासह 2-0 अशा फरकाने आघाडी घेत मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधाराला दुखापतीमुळे आगामी सामन्याला मुकावं लागणार आहे.

इंग्लंड वूमन्स टीमची कॅप्टन आणि ऑलराउंडर नॅट सायव्हर-ब्रंट हीला दुखापतीमुळे तिसऱ्या टी 20i सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंड आधीच मालिकेत पिछाडीवर आहे. त्यात कॅप्टन तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने इंग्लंडच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. नॅटला डाव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तिसऱ्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. याबाबतची माहिती आयसीसीन एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

नॅट मालिकेला मुकणार?

नॅटला गुरुवारी 3 जून रोजी दुखापत झाल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली. त्यामुळे नॅट तिसर्‍या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच उर्वरित 2 सामन्यात तिला खेळता येणार की नाही? याबाबतचा निर्णय मेडीकल रिपोर्ट आल्यानंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे नॅटला संपूर्ण मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यास इंग्लंडसाठी तो मोठा झटका असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.