Maharashtra Live Updates : 'त्यांना देशात पेशवाई स्थापित करायची आहे'; अमित शाह यांच्या दौऱ्यावर सपकाळ यांची टीका
Sarkarnama July 04, 2025 08:45 PM
Harshwardhan Sapkal to Amit Shah : 'त्यांना देशात पेशवाई स्थापित करायची आहे'; अमित शाह यांच्या दौऱ्यावर सपकाळ यांची टीका

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या पुणे (Pune) दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली. 'त्यांना देशात पेशवाई स्थापित करायची आहे. त्याची त्यांच्या कार्यकर्त्यांना स्मरण करून देण्यासाठी आले आहेत', असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Rupali Chakankar : बालविवाह झाल्यास, ग्रामपंचायत जबाबदार; रुपाली चाकणकर यांचा मोठा आदेश

राज्यात बालविवाह झाल्यास, ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तो झाला, त्या ग्रामपंचायतीचा सरंपच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांची शहानिशा करून कारवाई होईल, असा आदेश दिल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.