Solapur News: पंढरपूरचा कॅरिडाॅवर रद्द करा तर मंगळवेढ्याची हद्दवाढ मंजूर करा; राष्ट्रवादी पवार पक्षाचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
esakal July 04, 2025 08:45 PM

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा : पंढरपूरचा प्रास्तावित कॉरिडॉर रद्द करावा व मंगळवेढा नगरपरिषदेची हद्दवाढ मंजूर करा या मागणीचे भैरवनाथ उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी वारी नियोजनाची पाहणी दौऱ्यात दिले.

कराड तालुका हादरला! 'कोयत्याने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी, राजकीय चर्चा सुरू असतानाची घटना

यावेळी भाजप आ.समाधान आवताडे,सिध्दाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रथमेश पाटील ,संतोष रंदवे , सागर पडगळ  अमर सूर्यवंशी ,सिताराम भगरे , सागर गुरव व पंडीत गवळी उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवेढा नगरपरिषदेचा हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन अधिकारी सोलापूर यांच्याकडून नगर विकास विभागाकडे सादर केला असून मंत्रालया मधुन सदर प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसून मंगळवेढा नगरपरिषदेची मुळ हद्द ही मर्यादित असल्यामुळे शहरांमध्ये विकास कामे करण्यास वाव मिळत नाही.

नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यास विकासाच्या अनेक योजना शहरांमध्ये राबवणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी.तसेच पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.या पवित्र नगरीत राज्य सरकारने पंढरपूर कॉरिडॉर च्या माध्यमातून मंदिर परिसरामध्ये सुधारणा करण्याचे ठरविले या पंढरपुर कॉरिडॉरला पंढरपूर शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे जनतेच्या भावना डावलून राबवला जात असलेला हा प्रकल्प आहे.

सातारा तालुका हादरला! 'मैत्रीण दुसऱ्याबरोबर दिसल्याने मुलाने जीवन संपवले'; तिने मला धोका दिला मी जगणार नाही अन..

या प्रकल्पामुळे वारकरी परंपरा व धार्मिक सात्विकतेला धोका निर्माण होणार असून ऐतिहासिक वास्तू व जैवविविधतेवर संभाव्य परिणाम होणार आहे. त्याचबरोबर छोट्या व्यावसायिकांचे स्थलांतर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे नागरिक, वारकरी, व्यावसायिक यांच्या मतांचा सन्मान राखत, प्रकल्प त्वरीत रद्द करावा. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने दिलेल्या दोन प्रमुख निवेदनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.