इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय महिला संघाने पहिले 2 सामने जिंकून मालिकेत कडक सुरुवात केली आहे. भारताने या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. तर उभयसंघातील तिसरा सामना हा आज 4 जुलै रोजी केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 35 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. इंग्लंडने या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडने या मालिकेतील सलग 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे इंग्लंड मालिकेत 0-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी तिसरा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावला लागणार आहे. मात्र त्याआधी इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. या अटीतटीच्या सामन्यातून इंग्लंडची नियमित कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीला बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. अशात आता नॅट सायव्हर ब्रँट हीच्या अनुपस्थितीत टॅमी ब्यूमोंट ही इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून टॅमीसमोर ‘करो या मरो’ सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देण्याचं आव्हान आहे.
इंडिया वूमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा आणि श्री चरणी.
इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफिया डंकले, डॅनिएल वायट-हॉज, एलिस कॅप्सी, टॅमी ब्यूमोंट (कॅप्टन), एमी जोन्स (कर्णधार), पेज स्कॉलफिल्ड, सोफी एक्लेस्टोन, इस्सी वोंग, शार्लोट डीन, लॉरेन फायलर आणि लॉरेन बेल.