राज आणि मी अनुभव घेतला आहे, या नतद्रष्टांचा. वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला. आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत. अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाल ओळखत कोण होतं महाराष्ट्रात. कोणत्या भाषेत बोलत होता. राज तू सर्वांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीस म्हणाले, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर हो, आम्ही गुंड आहोत. आहोत आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी आहे. गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करूच. हे राजकीय बाडगे आहेत.
मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली. त्याचा अभिमान आहे. काय केलं. महाराष्ट्रात मराठी सक्तीची करावी लागली. मराठीचे दुश्मन कोण आहे. पण महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर काही लोक कोर्टात गेले. ती गुंडगिरी नाही होत. आता कोण तरी भेडिया. ही यांची सर्व पिल्लावळ आहे. तोडाफोडा आणि राज्य करा. आपण ज्या गोष्टी केल्या होत्या. म्हणतात शिवसेनेने काय केलं. राज तुला सोबत घेतो. तेव्हा आपण एकत्र होतो. आता एकत्र आलोय.
जे गुजरातमध्ये त्यांनी केलं. गेल्याच्या गेल्या निवडणुकीत गुजरातेत पटेल यांना आपटेल असं वातावरण केलं. त्यांनी पटेलांना भडकवलं. त्यांना वेगळं केलं. इतरांना एकत्र केलं. हरियाणातही जाटांना भडकवलं. त्यांना एकासाईडला केलं आणि इतरांना घेऊन सत्ता घेतली. महाराष्ट्रातही तेच केलं. मराठ्यांना भडकवलं. वेगळं केलं आणि इतरांना एकत्र घेऊन सत्ता मिळवली. आपण त्यांच्या पालख्याच घ्यायच्या की माय मराठींना सन्मानाने सोबत घेणार आहात. एकमेकांना भांडवत ठेवलं जातं.
मोदी जगभर फिरत आहेत. पट्टा घातला. स्टार ऑफ घाना. इकडे घान. तिकडे घाना. एकिकडे मोदीचा फोटो आणि दुसरीकडे शेतकऱ्याला बैल मिळत नाही. तो अंगावर नांगराचं जोखड घेतो. तिकडे मोदी स्टार ऑफ घाना. लाज वाटली पाहिजे.