महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेले पाहायला मिळालं. आज हे दोन्ही ठाकरे बंधू मिळून विजयी मेळावा पार पडत आहे. तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. दरम्यान भाषणा दरम्यान उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच आलोय अशी मोठी घोषणा केली.
‘काहीजण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असतील. रेडे कापत असतील.”
उद्धव ठाकरेंनी मंचावर बोलताना एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली. दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या घटनेवर काहींजणांच्या पोटात दुखतंय असं म्हणत त्यांनी शिंदेवर टीका केली आहे. ते म्हाणाले की, ” आम्ही एकत्र आलो म्हणून काहीजण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असतील. रेडे कापत असतील.” अंस म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.
“राज आणि मी अनुभव घेतला आहे”
एवढंच नाही तर, उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “राज आणि मी अनुभव घेतला आहे. या नतद्रष्टांचा. वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतलं. आता आम्ही दोघं वापर करून फेकून देणार. अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला कोणी ओळखलं असतं?”
“राज तू सर्वांची शाळा काढली”
तसेच उद्धव ठाकरेंचं कौतुक करत ते म्हणाले की, “राज तू सर्वांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती. सर्वच उच्च शिक्षित आहे. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात असं सुरू केलं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदुत्ववादी आहोत. तुम्ही काय हिंदुत्व शिकवता. 92-93 साली माझ्या शिवसैनिकांनी वाचवलं. तुमच्यापेक्षाही आम्ही कट्टर हिंदू आहोत. ”
फडणवीसांना इशारा
उद्धव ठाकरेंनी शिंदेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर आम्ही सर्वात मोठे गुंड आहोत. आहोत आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी आहे का? गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करूच मिळवू.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट इशाराच दिला आहे.