‘मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती आणि केलीच… महाराष्ट्रात मराठी सक्तीची करावी लागली…’ मराठी भाषेबद्दल बोलत असताना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करून सत्ता पाडणाऱ्यांवर वर देखील निशाणा साधला. विजयी मोळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हिंदी भाषेची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या करा हिंदीची सक्ती तुमच्या सात पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही.
एक फेक नरेटिव्ह पसरवायचं हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंच्या काळातलं… उद्धव ठाकरे एवढं काम करत होता तर गद्दारी करून का पाडलं, तेव्हा का नाही बोंबलात? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी अभिमानाने सांगेल माझ्या मंत्रीमंडळातील सहकारी इकडे बसले आहेत. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती आणि केलीच… महाराष्ट्रात मराठी सक्तीची करावी लागली. मराठीचे दुश्मन कोण आहे. पण महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यानंतर देखील काही लोक कोर्टात गेले. ती गुंडगिरी नाही होत. आता कोण तरी भेडिया. ही यांची सर्व पिल्लावळ आहे. तोडाफोडा आणि राज्य करा. आपण ज्या गोष्टी केल्या होत्या. म्हणतात शिवसेनेने काय केलं. राज तुला सोबत घेतो. तेव्हा आपण एकत्र होतो. आता एकत्र आलोय.
मराठी माणूस मुंबईबाहेर नेला म्हणतात. मग 14 वर्षात तुम्ही मराठी माणूस घालवला, उद्योगधंदे, मोठे ऑफिस घालवले, कुठे गेले? तेवढाच हिंदुस्तान आणि तेवढेच हिंदू आहेत का? आम्ही सर्व करत होतो. तुम्ही गद्दारी केली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे बसले. त्यांचे बुट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात. आपल्या डोळ्या देखत लचके तोडले जात आहे. किती काळ सहन करायचं?
प्रत्येकवेळी काय झालं की भांडाभांडी करणार. आम्ही एकत्र आल्यावर सत्ताप्राप्ती. काही म्हणतात यांचा म मराठीचा नाही. म महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्रही काबीज करू. आज निवडणुका नाही. सत्ता येते जाते. आपली ताकद एकजुटीत हवी. दरवेळी संकट आलं की एकत्र येतो. संकट गेल्यावर भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही. गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं.’ असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.