हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द; पालीत पावसात मनसेचा जल्लोष
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः हिंदी सक्तीचा अध्यादेश राज्य सरकारने रद्द केल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जल्लोष केला. पाली-सुधागडमध्ये मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वात सोमवारी (३० जून) सायंकाळी भरपावसात जल्लोष करण्यात आला. श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसरात लाडूवाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, त्यामुळे राज्याचा कारभार गतिमान होईल, असा विश्वास साठे यांनी व्यक्त केला. या वेळी पाली शहर अध्यक्ष दीपेश लहाने, शंकर कदम, भागवत जाधव, दत्ता पांगरे, रोहन साजेकर, रूपेश दळवी, संजय जाधव व अमित घाटवळ आदी उपस्थित होते.
पाली ः हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला.