स्वत:ची लघवी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात? खरंच सर्व आजार होतात दूर?
Tv9 Marathi July 05, 2025 09:45 PM

अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीत त्यांनी स्वत:ची लघवी पिण्यामुळे त्यांच्या शरीराला झालेल्या फायद्याबद्दल सांगितले होते. तेव्हापासून अनेकांनी हे सर्च करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर अनेकांनी हे सांगितल्याचं दिसून आलं की स्वत:ची लघवी पिण्याचे खरंच फायदे होतात. पण खरंच स्वत:चे मूत्र पिल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात का? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. हेल्थलाइनमधील अहवालानुसार, मूत्र पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे याचा कोणताही पुरावा नाही. अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की मूत्र पिल्याने बॅक्टेरिया, विषारी पदार्थ आणि हानिकारक पदार्थ रक्ताद्वारे शरीरात पोहोचतात. मूत्र पिल्याने मूत्रपिंडाचा संसर्ग देखील होऊ शकतो. नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

जुन्या काळात, डॉक्टर लघवीच्या चवीवरून मधुमेहाचे निदान करत असत.

मूत्र पिण्याची प्रथा हजारो वर्षांपूर्वीची आहे. आज ती मूत्र चिकित्सा, युरोफॅगिया किंवा युरोथेरपी म्हणून ओळखली जाते. जगातील काही भागात आयुर्वेदिक औषधांमध्येही मूत्राचा वापर केला जातो. प्राचीन रोम, ग्रीस आणि इजिप्तमधील अहवालांवरून असे दिसून येते की मुरुमांपासून कर्करोगापर्यंत सर्व उपचारांसाठी मूत्र चिकित्सा वापरली जात आहे. एक काळ असा होता जेव्हा डॉक्टर त्याच्या चवीनुसार मधुमेहासाठी मूत्र चाचणी करत असत.

एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार

एका वृत्तानुसार, एका 33 वर्षीय मुलाने स्वतःचे मूत्र पिण्यास सुरुवात केली आणि यामुळे त्याला त्याच्या शरीरातील सर्व आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळाली आहे. इतकेच नाही तर त्या मुलाला हाशिमोटोच्या थायरॉईड आजारापासून आणि दीर्घकालीन वेदनांपासून कायमची मुक्तता मिळाली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी त्याने प्रेस असोसिएशन या वृत्तसंस्थेला सांगितले होते की “त्याने त्याचे मूत्र पिण्यास सुरुवात केली. काही लोक याला ‘मूत्र चिकित्सा’ म्हणतात, परंतु त्याला युरोफॅगिया म्हणतात. तो पुढे म्हणाला की मूत्र पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे आरोग्य आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते.”

हे शरीरासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, दररोज सकाळी पहिली लघवी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते असं म्हटलं जातं. ते पिण्यासोबतच, लघवी सुती कापडाने गाळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा देखील चमकदार होते असही सांगितलं आहे. कॅनडाच्या 46 वर्षीय लीआ सॅम्पसन यांनी ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला माझ्या वाढत्या वजनाची काळजी वाटत होती पण लघवी पिल्याने माझे वजन झपाट्याने कमी झाले”

डॉक्टरांच्या मते मूत्र पिणे धोकादायक असतं का?

डॉक्टरांच्या मते, लघवी पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. डॉ. जुबैर अहमद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, लघवीमध्ये भरपूर बॅक्टेरिआ असतात पण हे तेव्हाच घडते जेव्हा तुमचे दोन्ही मूत्रपिंड ठीक असतात. पण ते शरीराबाहेर पडताच ते घाणेरडे होते आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. तसेच, ते पिल्याने तुम्हाला अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. या सर्वांव्यतिरिक्त, युरोफॅगियाच्या शारीरिक फायद्यांचा कोणताही पुरावा नाही. लघवी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे हा प्रयोग करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.